Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ७ फेब्रुवारी, २०२२, फेब्रुवारी ०७, २०२२ WIB
Last Updated 2022-02-07T07:00:32Z
Rojgar

ICSE बोर्डाच्या दहावी, बारावी टर्म १ परीक्षांचे निकाल जाहीर

Advertisement
ICSE, ISC Term 1 Result 2022 date: आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. विद्यार्थी गेले अनेक दिवस वाट पाहत असलेला दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेश(CISCE) ने ICSE तसेच ISC म्हणजेच अनुक्रमे दहावी आणि बारावीच्या सत्र १ परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. यासंदर्भात आयसीएसई बोर्डाने एक परिपत्रक जारी केले आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे देखील त्यांना निकाल कळू शकणार आहे. आयसीएसई दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल ऑनलाइन माध्‍यमातून आणि रिझल्ट टॅब्‍युलेशनच्या रुपात शाळांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट .cisce.org आणि cisce.org वर निकाल पाहता येणार आहे. निकालाची कोणतीही हार्ड कॉपी जारी केली जाणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. निकाल पाहण्यासाठी थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. ICSE 10th, 12th Result: असा पाहा निकाल स्टेप १) आयसीएसई, आयएससी सेमिस्टर १ निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जा आणि निकालाच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप २) आपली इयत्ता निवडा स्टेप ३) लॉगिन विंडोवर आपला आयडी, इंडेक्स नंबर आणि अन्य आवश्यक माहिती भरा. स्टेप ४) लॉग इन करा आणि निकाल डाऊनलोड करा. एसएमएस द्वारे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आयसीएसई, आयएससी सेमिस्टर १ निकाल एसएमएस द्वारे देखील कळू शकणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आयसीएसई (स्पेस) १२३४५६७ (सात अंकांचा आयडी) ही माहिती भरावी लागेल. ISC निकालासाठी, ISC(space)१२३४५६७ (सात अंकांचा आयडी) टाइप करा आणि हा मेसेज ०९२४८०८२८८३ वर पाठवा. आता परीक्षार्थीच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर वर निकालाचा मेसेज येईल. रिचेकिंगची सुविधा निकाल लागल्यानंतर जे विद्यार्थी मिळालेल्या गुणांवर समाधानी नसतील त्यांना रिचेकिंगची सुविधा देण्यात आली आहे. विद्यार्थ्याना पेपर रिचेकिंग करायचे असल्यात ते अधिकृत वेबसाइट cisce.org वर जाऊन रिचेकिंगसाठी अर्ज करु शकतात. यासाठी त्यांना प्रति पेपर एक हजार रुपये शुल्क भरावे लागेल. ही विंडो ७ ते १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत सक्रीय असेल.


source https://maharashtratimes.com/career/career-news/icse-board-results-icse-board-announced-10th-and-12th-term-1-examinations-results/articleshow/89397824.cms