Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२, फेब्रुवारी २८, २०२२ WIB
Last Updated 2022-02-28T09:00:12Z
Rojgar

ICSI CS Exam 2022: सीएस जून परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु, 'या' तारखेपर्यंत अर्ज करा

Advertisement
CS Exam 2022: आयसीएसआय म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीतर्फे (Institute of Company Secretaries, ICSI) सीएस परीक्षेच्या जून सत्रासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. सीएस फाउंडेशन (CS Foundation), सीएस एक्झिक्युटिव्ह (CS Executive)आणि सीएस प्रोफेशनल परीक्षांमध्ये (CS Professional Exams) बसू इच्छिणारे सर्व उमेदवार २५ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. यासाठी त्यांना ICSI च्या अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जाऊन अर्ज भरावा लागेल. ICSI : असा करा अर्ज उमेदवार पुढे दिलेल्या सोप्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून अर्ज करू शकतात. सर्वप्रथम उमेदवारांनी ICSI ची अधिकृत वेबसाईट icsi.edu वर जा. होमपेजवर दिसणार्‍या Student टॅबवर क्लिक करा. तुमचा तपशील टाकून लॉग इन करा. सर्व आवश्यक माहिती भरून अर्ज भरा. अर्ज फी भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. भविष्यातील उपयोगासाठी अर्ज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा. ICSI CS Exam 2022: परीक्षा कधी होणार? आयसीएसआयद्वारे जून सत्रासाठी सीएस परीक्षा १ ते १० जून २०२२ या कालावधीत होणार आहे. सर्व कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेदरम्यान उमेदवारांना जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे लागणार आहे. अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले जाणार आहेत. कोणतीही नवीन माहिती आणि नवीन अपडेट अधिकृत वेबसाइटवर मिळू शकणार आहे. यापूर्वी आयसीएसआयने डिसेंबर २०२१ च्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. ICSI CS Exam 2022: विलंब शुल्कासह संधी ज्या उमेदवारांना २५ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करता येणार नाही, त्यांना ICSI द्वारे आणखी एक संधी दिली जाणार आहे. उमेदवारांना ९ एप्रिल २०२२ पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरु शकतात. अर्ज पूर्ण भरल्यानंतर उमेदवारांनी आपला अर्ज डाउनलोड करुन त्याची प्रिंट काढू शकतात.


source https://maharashtratimes.com/career/career-news/icsi-cs-exam-2022-application-process-for-cs-june-exam-begins-apply-by-this-date/articleshow/89888774.cms