ICSI सीएस प्रोफेशनल २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर

ICSI सीएस प्रोफेशनल २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर

ICSI CS Professional 2021: आयसीएसआय म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीतर्फे (ICSI) कंपनी सेक्रेटरी डिसेंबर २०२१ च्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येत आहेत. कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनल परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट- icsi.edu वर निकाल तपासू शकतात. एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम (जुना आणि नवा अभ्यासक्रम) परीक्षांचा औपचारिक ई निकाल आणि गुण उमेदवारांना दुपारी २ वाजता वेबसाइटवर पाहता येणार आहेत. CS December Result 2021: असा पाहा निकाल सीएस प्रोफेशनल डिसेंबरचा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट icsi.edu वर लॉग इन करा. होमपेजवर, 'सीएस प्रोफेशनल (जुना आणि नवीन अभ्यासक्रम) निकाल' या लिंकवर क्लिक करा. तुमचे लॉगिन क्रेडेंशियल्स टाका आणि सबमिट वर क्लिक करा. तुमचा आयसीएसआय सीएस डिसेंबर २०२१ चा निकाल स्क्रिनवर दिसेल. निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढा. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार प्रोफेशनल आणि एक्झिक्युटिव्ह प्रोगामसाठी पुढील परीक्षा १ ते १० जून, २०२२ पर्यंत आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया २६ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होणार आहे. या परीक्षेला बसू इच्छिमाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधातील अधिक माहितीसाठी उमेदवारांना ऑफिशिअल वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. सीएस एक्झिक्युटिव्ह आणि सीएस प्रोफेशनल डिसेंबर २०२१ ची परीक्षा २१ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२१ या कालावधीत विविध परीक्षा केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेच्या निकालासंबंधीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/icsi-cs-professional-2021-exam-result-out-check-on-icsiedu-website/articleshow/89819410.cms

0 Response to "ICSI सीएस प्रोफेशनल २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel