JNU Vice Chancellor पदावर प्रोफेसर शांतीश्री धुलीपुडी पंडित, पहिल्या महिला कुलगुरू होण्याचा मान

JNU Vice Chancellor पदावर प्रोफेसर शांतीश्री धुलीपुडी पंडित, पहिल्या महिला कुलगुरू होण्याचा मान

Vice Chancellor: सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या (Savitribai Fule University) प्राध्यापक शांतीश्री धुलीपुडी पंडित () यांची जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या (Jawaharalal Nehru University) नवीन कुलगुरूपदी (Vice Chancellor) नियुक्ती करण्यात आली आहे. प्रोफेसर शांतीश्री धुलीपुडी पंडित या जेएनयूच्या असतील. शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून प्राध्यापक पंडित यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. जेएनयूच्या विद्यार्थ्यापासून पहिल्या महिला कुलगुरूपर्यंतचा प्रवास देशातील या प्रतिष्ठित विद्यापीठाच्या अध्यक्षपदी महिला कुलगुरू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्राध्यापक शांतीश्री धुलीपुडी पंडित या पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या राजकारण आणि लोकप्रशासन विभागात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. तसेच त्या जेएनयूच्या माजी विद्यार्थिनीही आहेत. प्राध्यापक शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी प्रेसिडेन्सी कॉलेज, मद्रास आणि कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीमध्येही शिक्षण घेतले. तसेच त्यांनी जेएनयूमधून आंतरराष्ट्रीय संबंधात एमफिल आणि भारतीय संसद आणि परराष्ट्र धोरण या विषयावर पीएचडी केली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीमधून त्यांनी सोशल वर्कमध्ये डिप्लोमाही केला आहे. तसेच मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून इतिहास आणि सामाजिक मानसशास्त्र आणि एमए राज्यशास्त्रात बी.ए.पूर्ण केले आहे. जगदीश कुमार यांची जागा घेणार जेएनयूचे प्रभारी कुलगुरू प्रोफेसर एम जगदेश कुमार यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. प्रोफेसर कुमार त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यापासून कार्यवाह कुलगुरूपदाची जबाबदारी सांभाळत होते. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद डिसेंबर महिन्यापासून रिक्त आहे. प्रा. डी. पी. सिंग यांचा यूजीसीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला. त्यांच्या जागी जगदीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुमार यांनी जेएनयूमध्ये पाच वर्षं पूर्ण केली आहेत. नवे कुलगुरू येईपर्यंत कुमार यांच्याकडेच विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा भार असणार आहे. जगदीश कुमार यांच्याविषयी जगदीश कुमार यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये उल्लेखनीय काम केले आहे. त्यांचे शिक्षण आयआयटी मद्रासमधून झाले. तेथून त्यांनी त्यांची मास्टर्स आणि पीएचडी पूर्ण केली. आयआयटी दिल्लीच्या इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागात त्यांनी प्रोफेसर म्हणूनही काम केले आहे. त्यांचा जन्म तेलंगणमधला आहे. कॅनडातील वॉटरलू विद्यापीठातून त्यांनी पोस्ट डॉक्टरल रिसर्च वर्क केले आहे. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, नॅनोटेक्नॉलॉजीत त्यांना रस आहे. त्यांना त्यांच्या कामासाठी ISA-VSIचा टेक्नोमेंटॉर पुरस्कारही मिळाला आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/jnu-vice-chancellor-professor-shantisree-dhulipudi-pandit-will-be-the-new-vice-chancellor-of-jnu-becomes-the-first-woman-vc/articleshow/89400196.cms

0 Response to "JNU Vice Chancellor पदावर प्रोफेसर शांतीश्री धुलीपुडी पंडित, पहिल्या महिला कुलगुरू होण्याचा मान"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel