Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ५ फेब्रुवारी, २०२२, फेब्रुवारी ०५, २०२२ WIB
Last Updated 2022-02-05T09:00:56Z
Rojgar

NEERI मध्ये विविध पदांची भरती, सरकारी नोकरीसाठी 'येथे' करा अर्ज

Advertisement
NEERI Recruitment: काऊन्सिल ऑफ सायन्टिफिक अॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च (Council of Scientific and Industrial Research, CSIR) अंतर्गत येणाऱ्या नॅशनल एन्व्हायर्नमेंट इंजिनीअरिंग रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर (National Environmental Engineering Research Institute) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन (NEERI Nagpur ) प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. नॅशनल एन्व्हायर्नमेंट इंजिनीअरिंग रिसर्च इंस्टिट्यूट अंतर्गत प्रोजेक्ट असोशिएट१ (Project Associate-I) आणि प्रोजेक्ट असोशिएट २ ( Project Associate-II) ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहे. प्रोजेक्ट असोशिएट १ या पदाची १ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमएससी फिजिक्स किंवा बीई केमिकल/मेकॅनिकल/सिव्हिल पर्यंत शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे. प्रोजक्ट असिस्टंट १ या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २५ हजार ते ३१ हजार रुपये अधिक एचआरए असा पगार देण्यात येणार आहे. प्रोजेक्ट असोशिएट २ या पदाच्या ३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमएससी फिजिक्स/जिऑलॉजी किंवा बीई केमिकल/मेकॅनिकल/सिव्हिल पर्यंत शिक्षण पूर्ण असणे अनिवार्य आहे. यासोबतच अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संबंधित पदाच्या कामाचा दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांन दरमहा २८ हजार रुपये अधिक एचआरए असा पगार देण्यात येईल. दोन्ही पदांसाठी उमेदवाराचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट आकाराचा फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी आपला अर्ज १४ फेब्रुवारीपर्यंत पाठवायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


source https://maharashtratimes.com/career/career-news/csir-neeri-recruitment-various-post-vacant-in-national-environmental-engineering-research-institute/articleshow/89361883.cms