NIPUN: प्रायमरीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ५०० रुपये, डिटेल्स जाणून घ्या

NIPUN: प्रायमरीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ५०० रुपये, डिटेल्स जाणून घ्या

Primary students Scheme: करोना काळात झालेले मुलांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने मुलांसाठी लर्निंग रिकव्हरी प्लान (Learning Recovery Plan, LRP) तयार करण्यात आला आहे. शिक्षण मंत्रालयाचे ( Ministry) सहसचिव मनीष गर्ग यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. या योजनेवर लवकरात लवकर काम सुरू करण्याच्या सूचना सर्व राज्यांना देण्यात आल्या आहेत. लर्निंग रिकव्हरी प्लान (Learning Recovery Plan) अंतर्गत शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील सर्व विद्यार्थ्यांसाठी ५०० रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्रावर वाईट परिणाम झाला. मुलांच्या शिक्षणावरही याचे गंभीर परिणाम पाहायला मिळाले. या दोन वर्षाच्या काळात अनेक विद्यार्थ्यांना आपले पालक गमवावे लागले. खासगी शाळांतील शिक्षण परवडू न शकल्याने सरकारी शाळांमधील प्रवेश वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पुढाकार घेऊन एका योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान भरुन काढण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेअंतर्गत सरकारने मुलांना शिकवण्यासाठी एलआरपी ही सर्वसमावेशक योजना तयार केली आहे. या संदर्भात शिक्षण मंत्रालयाचे सहसचिव मनीष गर्ग यांच्या वतीने राज्यांना पत्र लिहून या योजनेवर तात्काळ काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये उच्च प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील सर्व विद्यार्थ्यांसाठी ५०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. याद्वारे विद्यार्थ्यांच्या पालकांना थोड्याफार प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर निपुण भारत मिशनअंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. योजनेंतर्गत शिक्षकांना शिक्षक संसाधन पॅकेज किंवा टीआरपीमध्ये टॅबलेटही दिले जातील. काय आहे निपुण भारत मिशन? नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग आणि न्युमरसी (National Initiative for Proficiency in Reading with Understanding and Numeracy) यापासून निपुण हा शब्द बनला आहे. मुलांना चांगले आकलन आणि संख्यात्मक ज्ञानासह अभ्यासात पारंगत करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय पुढाकार घेतला आहे. त्याचे नाव 'कुशल' असे ठेवण्यात आले आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/primary-students-scheme-to-compensate-for-the-loss-caused-by-corona-19-primary-students-will-get-rs-500-assistance-in-the-new-session/articleshow/89792343.cms

0 Response to "NIPUN: प्रायमरीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ५०० रुपये, डिटेल्स जाणून घ्या"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel