Railway Recruitment 2022: मध्य रेल्वेत ‘या’ पदांसाठी मोठी भरती सुरू, दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

Railway Recruitment 2022: मध्य रेल्वेत ‘या’ पदांसाठी मोठी भरती सुरू, दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

भारतीय रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुकांना सुवर्णसंधी मिळणार आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल, मध्य रेल्वेने विविध पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. ही भरती शिकाऊ कायदा १९६१ अंतर्गत केली जात आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी १६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण २४२२ पदांची भरती केली जाणार आहे. अधिकृत अधिसूचनेद्वारे उमेदवार महत्त्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, अनुभव, निवड निकष आणि इतर तपशील तपासू शकतात.

१७ जानेवारी २०२२ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार १६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज सादर करू शकतात. या पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान ५० टक्के गुणांसह १० वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (१०+२ परीक्षा प्रणाली अंतर्गत) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Railway Jobs 2022: रेल्वेत २४०० पदांसाठी भरती, दहावी-बारावी पास उमेदवारांसाठी संधी

या पदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा १५ वर्षे आणि २४ वर्षांपेक्षा कमी असावी. कृपया लक्षात घ्या की उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीवर आधारित असेल. इच्छुक उमेदवार १६ फेब्रुवारी २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांना त्यांची स्वाक्षरी अपलोड करावी लागेल.

The post Railway Recruitment 2022: मध्य रेल्वेत ‘या’ पदांसाठी मोठी भरती सुरू, दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी appeared first on Loksatta.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Railway Recruitment 2022: मध्य रेल्वेत ‘या’ पदांसाठी मोठी भरती सुरू, दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधीhttps://ift.tt/HIY1dLFZq

0 Response to "Railway Recruitment 2022: मध्य रेल्वेत ‘या’ पदांसाठी मोठी भरती सुरू, दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel