RBI Recruitment: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती

RBI Recruitment: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती

2022: भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये () नोकरीच्या शोधात असलेल्या किंवा सहाय्यक भरती परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्यांच्या विविध कार्यालयांमध्ये ९५० सहाय्यक पदांच्या भरतीसाठी (RBI Recruitment) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बँक ऑफ द बँक अर्थात आरबीआयने जाहीर केलेल्या भरती जाहिरात (No.2A/2021-22) नुसार, असिस्टंट - २०२१ भरती प्रक्रिया सहाय्यक पदाच्या रिक्त पदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी आयोजित केली जात आहे. पात्रता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सहाय्यक पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बँकेने ठरवून दिलेले पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. सहाय्यक पदांसाठी (Assistant Post) आरबीआयने छोटी जाहिरात जाहीर केली आहे. पात्रतेच्या तपशिलांशी संबंधित माहिती अधिकृतपणे प्रसिद्ध केलेली नाही. ही माहिती उमेदवारांना आरबीआय सहाय्यक भरती २०२२ च्या नोटिफिकेशनद्वारे मिळू शकेल. मागील वर्षांच्या आरबीआय सहाय्यक भरती नोटिफिकेशननुसार, मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेले किंवा अंतिम वर्ष सेमिस्टर परीक्षा दिलेले उमेदवार यासाठी पात्र असतील. तसेच, कट ऑफ तारखेनुसार उमेदवारांचे वय २० वर्षांपेक्षा कमी आणि २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार सवलत दिली जाणार आहे. अर्ज प्रक्रिया RBI सहाय्यक भरती २०२१ अंतर्गत जाहिरात केलेल्या ९५० रिक्त जागांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट rbi.org.in वरील ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतील. आरबीआयद्वारे १७ फेब्रुवारी २०२२ पासून सहाय्यक पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.सहाय्यक भरती जाहिरातीमध्ये याची माहिती देण्यात आली आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ८ मार्च २०२२ पर्यंत त्यांचे अर्ज ऑनलाइन माध्यमातून पाठवू शकतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या जाहिरातीत सहाय्यक पदांसाठी पात्र उमेदवारांच्या निवड प्रक्रियेबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे. आरबीआय सहाय्यक भरती २०२२ नुसार उमेदवारांना प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि भाषा प्रवीणता चाचणी (LPT) या टप्प्यांतून जावे लागेल. पहिल्या टप्प्यातील ऑनलाइन परीक्षा २६ ते २७ मार्च २०२२ रोजी होणार आहे. आरबीआय एसओ परीक्षा आरबीआयच्या नोटिफिकेशननुसार कायदा अधिकारी ग्रेड B (Officer Grade B), व्यवस्थापक (तांत्रिक-सिव्हिल) (Administrator (Technical-Civil), व्यवस्थापक (तांत्रिक-विद्युत) Administrator (Technical-Electrical), ग्रंथालय व्यावसायिक (सहाय्यक ग्रंथपाल) ग्रेड A Library Professional (Assistant Librarian) Grade A, आर्किटेक्ट ग्रेड A (Architect Grade A)ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी १५ जानेवारी २०२२ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. तर इच्छुक उमेदवारांना ४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. RBI SO भरती परीक्षा ६ मार्च २०२२ रोजी होणार आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/rbi-assistant-recruitment-950-assistant-recruitment-advertisement-released-in-reserve-bank-of-india-know-eligibility-application-and-selection-process/articleshow/89561652.cms

0 Response to "RBI Recruitment: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel