SBI Recruitment 2022: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्सच्या पदांसाठी रिक्त जागा आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ५ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू झाली असून २५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असेल. अर्ज करण्यासाठी, अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्यावी लागेल.
पदांचा तपशील
या भरती प्रक्रियेअंतर्गत ५ मार्चपासून ऑनलाइन चाचणी होणार आहे. रिक्त पदांपैकी, असिस्टंट मॅनेजर (नेटवर्क सिक्युरिटी स्पेशलिस्ट) साठी १५ पदे, असिस्टंट मॅनेजर (रूटिंग आणि स्विचिंग) साठी ३३ पदे आहेत अशी एकूण रिक्त पदांची संख्या ४८ आहे.
याशिवाय सहाय्यक उपाध्यक्षाची २ पदे, वरिष्ठ कार्यकारी (डिजिटल मार्केटिंग) १ पद, वरिष्ठ कार्यकारी (जनसंपर्क) १ पदासह एकूण ४ पदे रिक्त आहेत. या पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे.
(हे ही वाचा: Recruitment 2022: ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरीची संधी, पगार ७८ हजारांपर्यंत)
वायोमार्यदा काय?
४० वर्षांपर्यंतचे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. जन्म तारखेपासून ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत वयाची गणना केली जाईल.
पगार किती?
निवडलेल्या उमेदवारांना मूळ वेतन म्हणून ३६ हजार ते ६३,८४० पर्यंत वेतनश्रेणी मिळेल. याशिवाय त्यांना इतर भत्तेही मिळतील.
(हे ही वाचा: India Post Office recruitment 2022: नवीन सूचना जारी; पगार ६३ हजारांहून अधिक)
कशी असेल परीक्षा?
या भरतीसाठी एकूण १०० गुणांची व्यावसायिक ज्ञान चाचणी असेल. यात ८० प्रश्न असतील आणि उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी १२० मिनिटे मिळतील.
The post SBI Recruitment 2022: विविध पदांसाठी भरती, ६३ हजारांहून अधिक पगार, जाणून घ्या तपशील appeared first on Loksatta.
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: SBI Recruitment 2022: विविध पदांसाठी भरती, ६३ हजारांहून अधिक पगार, जाणून घ्या तपशीलhttps://ift.tt/l4PwAIn
0 टिप्पण्या