Advertisement

UPSC CSE 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२२ (UPSC ) संदर्भात एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. यूपीएससी नागरी सेवा २०२२ () मधील काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी होणाऱ्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या रिक्त जागांची संख्या वाढवण्यात आली आहे. याअंतर्गत रेल्वेसाठी काही नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. आता भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (Indian Railway Management Services) म्हणजेच आयआरएमएस ग्रुप ए भरती (IRMS Group A Recruitment) देखील यूपीएससी नागरी सेवा परीक्षेद्वारे केली जाणार आहे. यासंदर्भात केंद्रीय लोकसेवा आयोगाने नोटीस जाहीर केली आहे. युनियन लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२२ च्या नवी अपडेट अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार रिक्त पदांमध्ये १५० पदे वाढली आहेत. ८६१ पदांसाठी होणार होती. आता ती एकूण १०११ पदांसाठी होणार आहे. भारतीय रेल्वेचा एक भाग असलेल्या आयआरएमएसमध्ये नवीन १५० पदे भरली जाणार आहेत. ही संभाव्य रिक्त जागांची भरती असून गरजेनुसार त्यात वाढ किंवा घटही केली जाऊ शकते असेही स्पष्ट करण्यात आले आहे. IRMS म्हणजे काय? भारतीय रेल्वेने नोटीस जाहीर करून दिलेल्या माहितीनुसार देशातील ८ वेगवेगळ्या राष्ट्रीय वाहतूक सेवांचे विलीनीकरण करण्यात आले आहे. या सर्व वाहतूकदारांना एकत्र करून आयआरएमएस तयार करण्यात आला आहे. तिचे पूर्ण नाव भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा आहे. IRMS ग्रुप ए रिक्त जागांचा तपशील आयआरएमस मधील ग्रुप ए पदांसाठी भरती केली जाणार आहे. यूपीएससी नागरी सेवा परीक्षेद्वारे ही भरती केली जाणार आहे. यावर्षी या विभागात १५० पदे भरण्यात येणार आहेत. यापैकी ६ पदे दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव असतील. पात्रता यूपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, आयआरएमएस ग्रुप ए पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये बसण्यासाठी यूपीएससीच्या इतर परीक्षांप्रमाणेच पात्रता पूर्ण करावी लागणार आहे. ज्या उमेदवारांनी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२२ साठी आधीच अर्ज केला असेल त्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. नागरी सेवा आणि वनसेवा प्राथमिक परीक्षा देणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अंतिम वर्ष/सेमिस्टर परीक्षेत बसलेले उमेदवार देखील यूपीएससीद्वारे आयोजित नागरी सेवा आणि वन सेवांच्या एकत्रित प्राथमिक परीक्षेत बसू शकतात. आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या तारखांना उमेदवारांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी आणि ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावे. विविध राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत सरकारी नियमांनुसार सवलत देण्यात आली आहे. उमेदवारांना अधिक आणि इतर तपशीलांसाठी नोटिफिकेशन पाहता येणार आहे. ईएसई परीक्षेच्या तारखा जाहीर यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा परीक्षेच्या मुलाखतीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग श्रेणी या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तर, ईएसई पर्सनॅलिटी टेस्ट २०२१ साठी पात्र झालेले उमेदवार यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वरून संपूर्ण वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. उमेदवार नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या वेळेनुसार मुलाखतीला पोहोचणे आवश्यत आहे. ही परीक्षा २८ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२२ या कालावधीत घेतली जाणार आहे. यावेळी व्यक्तिमत्व चाचणीची तारीख आणि वेळेत बदल करण्याची कोणतीही विनंती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्या. परीक्षेच्या आधी प्रवेशपत्र अपलोड केले जाणार आहे. नवीन अपडेटसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/upsc-cse-2022-upsc-civil-services-exam-2022-vacancy-increased-new-posts-added-for-railways/articleshow/89681202.cms