Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २ फेब्रुवारी, २०२२, फेब्रुवारी ०२, २०२२ WIB
Last Updated 2022-02-02T05:43:17Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

UPSC IAS Prelims 2022 : नागरी सेवा परीक्षेचं नोटिफिकेशन जाहीर होणार, यूपीएससीकडून मोठ्या घोषणेची शक्यता Rojgar News

Advertisement
UPSC Civil Service

UPSC IAS Prelims 2022 Notification नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगानं (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2022 (CSE) साठी 2 फेब्रुवारी म्हणजेच आज नोटिफिकेशन जारी करण्याची शक्यता आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर आजपासून नागरी सेवा परीक्षेसाठी नोंदणी सुरू होईल. केंद्रीय लोकसेवा आयोगाने यापूर्वी जाहीर केलेल्या वार्षिक अंदाजित वेळापत्रकानुसार या तारखांची घोषणा करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन या संदर्भातील माहिती तपासणे आवश्यक आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगानं यापूर्वी जाहीर केलेल्या नियोजनाप्रमाणं 5 जूनला परीक्षा होणार आहे. या परीक्षेसंदर्भात महत्त्वाची घोषणा आज होण्याची शक्यात आहे. यूपीएससी नेमक्या किती जागांसाठी यंदाच्या नागरी सेवा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करणार याकडे विद्यार्थ्याचं लक्ष लागलं आहे. नागरी सेवा परीक्षा तीन टप्प्यात घेण्यात येते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जातो. नागरी सेवा परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी तयारी करत असतात.

पूर्व परीक्षा 5 जून रोजी होणार

केंद्रीय लोकसेवा आयोगाने यापूर्वी जाहीर केलेल्या तारखांनुसार सीएससी म्हणजेच नागरी सेवा पूर्व परीक्षेची तारीख 5 जून 2022 निश्चित करण्यात आली आहे. ही परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येईल. विद्यार्थी आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन परीक्षेच्या तारखा नोंदणी संदर्भातील इतर माहिती आणि परीक्षेचं वार्षिक वेळापत्रक देखील तपासू शकतात. नागरी सेवा परीक्षेसाठी नोंदणीसाठी लोकसेवा आयोग 20 दिवसांची मुदत देण्याची शक्यता आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर अधिक माहिती उपलब्ध

नागरी सेवा परीक्षा संबंधित अधिक माहिती आयोगाच्या वेबसाईटवर जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशन मध्ये उपलब्ध होईल. उमेदवारांनी पात्रता, परीक्षा शुल्क आणि इतर माहितीसाठी वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना वेबसाईट वर स्वतःचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीची नोंदणी करून स्वतःचं लॉगीन तयार करुन अर्ज भरावा लागेल. नागरी सेवा परीक्षेच्या अधिक अपडेटसाठी विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटला भेट द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

इतर बातम्या:

Nagpur NMC | नदी काठावरील अतिक्रमणाविरुद्ध मोठी कारवाई; न्यायालयाच्या आदेशानंतर नागपूरचे मनपा आयुक्त म्हणाले…

Pune Election : पुणे महापालिकेची प्रभागरचना जाहीर, सत्तेच्या चाव्या नव्यानं समाविष्ट 34 गावांच्या हाती जाणार?

UPSC will issue notification of Civil Services exam 2022 check details at upsc gov in


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: UPSC IAS Prelims 2022 : नागरी सेवा परीक्षेचं नोटिफिकेशन जाहीर होणार, यूपीएससीकडून मोठ्या घोषणेची शक्यताhttps://ift.tt/BCWzgdRZF