AICTE: जेईई मेन न देता मिळेल बीटेक आणि बीईमध्ये प्रवेश

AICTE: जेईई मेन न देता मिळेल बीटेक आणि बीईमध्ये प्रवेश

Announcement: इंजिनीअरिंग प्रवेशासाठी (engineering Admission) यापुढे जेईई-मेन (JEE Main) अनिवार्य राहणार नाही. ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (All India Council for Technical Education, AICTE)तर्फे येत्या शैक्षणिक सत्रापासून बी.टेक (B.Tech) आणि बीई (BE) अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षापासून लॅटरल प्रवेशाची सुविधा सुरू केली जाणार आहे. एआयसीटीईने (AICTE) यासाठी सर्व विद्यापीठे आणि राज्यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाचे डिप्लोमाधारक, बीएससी डिग्री आणि या क्षेत्रातील वोकेशनल डिप्लोमा असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. एआयसीटीईचे सल्लागार डॉ. रमेश उन्नीकृष्णन यांनी पाठवलेल्या पत्रात आणि बीईच्या द्वितीय वर्षाचे प्रवेश आता लॅटरल एन्ट्रीद्वारे करता येणार असल्याचे या पत्रामध्ये म्हटले आहे. यासाठी एआयसीटीईने प्रवेश पात्रता आणि नियमही निश्चित केले आहेत. यामध्ये प्रवेशाची पात्रता तीन स्तरांवर निश्चित करण्यात आली आहे. येथे बीटेक आणि बीई प्रोग्राम्सच्या प्रवेशासाठी, बॅचलर ऑफ व्होकेशनल हे डिप्लोमा इन इंजिनीअरिंग आणि बीएससीच्या समकक्ष मानले जाणार आहे. पात्रता स्तर जाणून घ्या दोन किंवा तीन वर्षांचे डिप्लोमाधारक विद्यार्थी इंजिनीअरिंग आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही शाखेत प्रवेश घेऊ शकतात. सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के आणि एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे. बीएससी पदवी असलेले विद्यार्थी पार्श्विक प्रवेशाद्वारे देखील नोंदणी करू शकतात. असे असले तरीही पदवी (४५ टक्के गुण) सोबत बारावीमध्ये गणिताचा अभ्यास करणे अनिवार्य आहे. यामध्येही एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे. इंजिनीअरिंग आणि तंत्रज्ञानातील व्यावसायिक डिप्लोमा असलेल्या विद्यार्थ्यांनाही लॅटरल एंट्रीद्वारे प्रवेश मिळणार आहे. यामध्ये या विद्यार्थ्यांसाठी नंतर ब्रिज कोर्सेस घेण्याची व्यवस्था विद्यापीठांना करावी लागणार आहे. यामध्ये गणित, भौतिकशास्त्र, इंजिनीअरिंग, ड्रॉइंग इत्यादी विषयांवर विशेष कोचिंग किंवा तयारी केली जाणार आहे. यामुळे सामान्य विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम अधिक चांगल्या प्रकारे समजू शकणार आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/aicte-announcement-now-admission-in-btech-and-be-will-be-available-without-jee-main/articleshow/90194470.cms

0 Response to "AICTE: जेईई मेन न देता मिळेल बीटेक आणि बीईमध्ये प्रवेश"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel