एमपीएससी मंत्र ; चालू घडामोडींची तयारी ; राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षा

एमपीएससी मंत्र ; चालू घडामोडींची तयारी ; राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षा

फारूक नाईकवाडे

राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षेतील चालू घडामोडी या घटकाच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम पाहिला तर लक्षात येते की, सामान्य अध्ययन घटकामध्ये कमी घटक समाविष्ट आहेत. त्यामुळे चालू घडामोडी या घटकावर किमान दहा प्रश्न विचारले जाऊ शकतात. या घटकाचा अभ्यासक्रम चालू घडामोडी, जागतिक तसेच भारतातील असा थोडक्यात विहित केलेला आहे. त्यामुळे नेमके व अपेक्षित मुद्दे लक्षात येण्यासाठी आणि त्याआधारे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी प्रश्नांचे नेमके स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे. प्रश्नांचे स्वरूप लक्षात आले की, नेमके काय वाचायला हवे ते कळते. त्यासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे नियमित वाचन आणि विश्लेषण करायला हवे.

तिन्ही परीक्षांच्या आधीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केले तर लक्षात येते की, वन सेवा आणि कृषी सेवा परीक्षेमध्ये बहुविधानी प्रश्न जास्त प्रमाणात होते, तर अभियांत्रिकी परीक्षेमध्ये प्रश्न बऱ्याच प्रमाणात सरळसोट, एका शब्दात उत्तरे द्या प्रकारचे होते. संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये चालू घडामोडींवरील प्रश्न हे बहुविधानी आणि विश्लेषणात्मक प्रकारचे असतील अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे चालू घडामोडींची तयारी गांभीर्याने करणे आवश्यक आहे. याची तयारी पुढीलप्रमाणे करता येईल:

जागतिक चालू घडामोडी 

यामध्ये क्रीडा, विज्ञान, पुरस्कार, संमेलने, व्यक्तिविशेष याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या बाबी येतात.

विश्वचषक, ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा, इतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, त्यातील विक्रम, भारत/ महाराष्ट्र यांची कामगिरी यांचा आढावा घ्यायला हवा.

साहित्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार, चर्चेतील महत्त्वाची पुस्तके व त्यांचे लेखक, चर्चेतील लेखकांबाबतच्या महत्त्वाच्या बाबी पाहाव्यात.

चित्रपट संगीत, पत्रकारिता, प्रशासन, संशोधन, शैक्षणिक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त व्यक्ती माहीत असाव्यात. भारतातील व्यक्तींना हे पुरस्कार मिळाले असल्यास त्यांच्याबाबतची अतिरिक्त माहिती असणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था तसेच संघटना यांची स्थापना, उद्देश, ठळक कार्य, ब्रीदवाक्य, त्याचा भारत सदस्य केव्हा झाला, भारताची संघटनेतील भूमिका, संघटनेचा नवीन ठराव किंवा इतर चर्चेतील मुद्दे या आधारावर तयारी करावी.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे निर्देशांक व त्यातील भारताचे स्थान, निर्देशांक/ अहवाल प्रकाशित करणारी संस्था/ संघटना, महत्त्वाच्या निर्देशांकांचे निकष, त्यातील भारताचे अद्ययावत व मागील वर्षीचे स्थान हे मुद्दे लक्षात घ्यावेत. यामध्ये दारिद्रय़, बेरोजगारी, भूक, आरोग्य याबाबतचे निर्देशांक प्रामुख्याने पाहावेत.

भारतातील चालू घडामोडी

राज्यव्यवस्थेशी संबंधित चालू घडामोडींबाबत घटनात्मक तरतुदी समजून घ्याव्यात.

लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या वर्षी महत्त्वाची आकडेवारी, निवडणूक आयोगाचे नवे निर्णय यांचा आढावा घ्यावा.

भारतातील क्षेपणास्त्रे, रणगाडे, लढाऊ विमाने, पाणबुडय़ा, युद्धनौका, रडार व इतर यंत्रणा यांचे नाव, प्रकार, वैशिष्टय़, वापर, विकसित करणारी संस्था, असल्यास अद्ययावत चाचणीचे परिणाम या मुद्दय़ांच्या आधारे टेबलमध्ये नोट्स काढाव्यात.

भारताचे शेजारी देशांशी असलेले विवाद किंवा नवे संयुक्त प्रकल्प तसेच इतर देशांशी भारताने संयुक्तपणे सुरू केलेले प्रकल्प, युद्धाभ्यास यांचाही आढावा घेणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था तसेच संघटना यांची स्थापना, उद्देश, ठळक कार्ये, ब्रीदवाक्य, त्याचा भारत सदस्य केव्हा झाला, भारताची संघटनेतील भूमिका, संघटनेचा नवीन ठराव किंवा इतर चर्चेतील मुद्दे या आधारावर तयारी करावी.

सामान्य अध्ययन घटकामध्ये अर्थव्यवस्था हा घटक समाविष्ट नसला तरी काही आर्थिक बाबींबाबतच्या चालू घडामोडींवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.

केंद्रीय व राज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी माहीत असायला हव्यात.

आर्थिक विकास दर, बँक दर, जीएसटी, आर्थिक क्षेत्रातील नवे निर्णय, जीडीपी, जीएनपी यांची अद्ययावत माहिती असायला हवी.

शासकीय योजनांचे उद्दिष्ट, सुरू झालेले वर्ष, तरतुदी, लाभार्थ्यांचे निकष, अंमलबजावणी यंत्रणा, असल्यास अपवाद, असल्यास कालमर्यादेतील उद्दिष्टे यांचा टेबलमध्ये नोट्स काढमून अभ्यास करावा. यामध्ये नव्या योजनांवर भर द्यायला हवा. मात्र मागील पाच ते सात वर्षांमधील योजनांचा समावेश केल्यास उत्तम.

वैज्ञानिक शोध, आरोग्यविषयक शोध, इस्रोचे प्रकल्प यांचा आढावा घ्यायला हवा.

नैसर्गिक आपत्ती, मागील वर्षभरात घडलेली वैशिष्टय़पूर्ण भौगोलिक, खगोलशास्त्रीय आणि लक्षणीय पर्यावरणीय घटना याबाबत मूलभूत व संकल्पनात्मक माहिती करून घ्यावी.

खगोलशास्त्रीय शोध, वैज्ञानिक शोध, तंत्रज्ञानविषयक अद्ययावत माहिती, भारताचा सहभाग असलेले महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय प्रकल्प यांचा आढावा घ्यावा.

साथीचे रोग, त्यावरचे उपाय, जागतिक आरोग्य संघटनेच्या महत्त्वाच्या घोषणा यांचा आढावा घ्यायला हवा.

पर्यावरणाशी संबंधित वन अहवाल, प्रदूषणाशी संबंधित निर्देशांक, हवामान बदलाशी संबंधित अद्ययावत घडामोडी, संमेलने व त्यातील ठराव,  कवउठ च्या याद्यांमध्ये समाविष्ट भारतातील प्रजाती, असल्यास हरित न्यायाधिकरणाचे चर्चेतील निर्णय यांचा आढावा घ्यावा.

चित्रपट, संगीत, पत्रकारिता, प्रशासन, संशोधन, शैक्षणिक क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त व्यक्ती माहीत असाव्यात. पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्ती व त्यांचे कार्यक्षेत्र, शौर्य पुरस्कारप्राप्त व्यक्ती माहीत असाव्यात.

चर्चेतील व्यक्ती, त्यांचे कार्यक्षेत्र, नियुक्त्या, निवड, बढती यांचा आढावा घ्यायला हवा.

राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा, त्यातील विजेते, महाराष्ट्राची कामगिरी यांचा आढावा घ्यायला हवा.

राष्ट्रीय स्तरावरील साहित्य, चित्रपट, संगीत, पत्रकारिता, प्रशासन, शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार तसेच पद्म पुरस्कार, शौर्य पुरस्कारप्राप्त व्यक्ती माहीत असाव्यात.

महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार, राज्य स्तरावरील महत्त्वाची संमेलने यांची माहिती असायला हवी.

संदर्भ साहित्य:

नव्या योजना, कायदे यांच्यासाठी योजनेचे संकेतस्थळ व कायद्याची मूळ प्रत इंडिया इअर बुकमधील प्रकरणे केंद्र व राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल व अर्थसंकल्प ‘योजना’, ‘कुरुक्षेत्र’, ‘लोकराज्य’ ही नियतकालिके ‘द हिंदू’ व ‘लोकसत्ता’ किंवा कोणतेही एक इंग्रजी व मराठी वृत्तपत्र बाजारात उपलब्ध असलेले चालू घडामोडींचे संकलन


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: एमपीएससी मंत्र ; चालू घडामोडींची तयारी ; राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षाhttps://ift.tt/9f2uzVO

0 Response to "एमपीएससी मंत्र ; चालू घडामोडींची तयारी ; राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel