जेईई मेन २०२२ परीक्षेची तारीख जाहीर, आजपासून नोंदणी प्रक्रिया सुरु

जेईई मेन २०२२ परीक्षेची तारीख जाहीर, आजपासून नोंदणी प्रक्रिया सुरु

exam: परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आज अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जेईई मेन २०२२ परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. यानुसार एनटीए जेईई मेन २०२२ एप्रिल आणि मे या दोन सत्रांमध्ये आयोजित केली जाणार आहे. जेईई मेन २०२२ फेज १ ही १६ ते २१ एप्रिल दरम्यान आयोजित केली जाईल तर जेईई मेन २०२२ फेज ही २४ ते २९ मे दरम्यान आयोजित केली जाणार आहे. जेईई मेन परीक्षा २०२२ च्या वेळापत्रकासोबतच एनटीएने जेईई मेन २०२२ ची नोंदणी प्रक्रिया १ मार्चपासून सुरु केली आहे. जेईई मेन २०२२ परीक्षेच्या एक किंवा सर्व सत्रांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज भरता येणार आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार, एनटीए जेईई मेन्स २०२२ (NTA JEE Mains 2022) फक्त दोनदा घेण्यात येणार आहे. एनटीए जेईई मुख्य परीक्षा २०२२ मध्ये बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतिम मुदतीपूर्वी जेईई अर्ज फॉर्म २०२२ सबमिट करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना एनटीए जेईई मेन वेबसाइट - jeemain.nta.nic.in २०२२ वर जेईई मुख्य २०२२ चे माहितीपत्रक देखील तपासता येणार आहे. जेईई मेन २०२२ ब्रोशरमध्ये विद्यार्थ्यांना आयआयटी जेईई परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेविषयी महत्त्वाची माहिती मिळू शकणार आहे. महत्वाच्या तारखा जेईई मेन २०२२ नोंदणीची सुरुवात - १ मार्च २०२२ जेईई मेन २०२२ साठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख - ३१ मार्च २०२२ जेईई मुख्य परीक्षेची तारीख २०२२ सत्र 1१– १६,१७,१८,१९, २० आणि २१ एप्रिल २०२२ सत्र २ – २४,२५,२६,२७,२८ आणि २९ मे २०२२ जेईई मेन परीक्षा पॅटर्न जेईई मेन २०२२ च्या पेपर पॅटर्नबद्दल खूप चर्चा होते आहे, शक्यता वर्तवण्यात येत आहेत. असे मानले जाते आहे की यंदा पेपर पॅटर्नमध्ये बदल होणे शक्य नाही. यावर्षी बारावीचा अभ्यासक्रम बदलला आहे, पण तरीही जेईई मेन चा पॅटर्न बदलण्याची शक्यता कमी आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/jee-main-2022-exam-date-announced-registration-process-starts-from-today/articleshow/89938123.cms

0 Response to "जेईई मेन २०२२ परीक्षेची तारीख जाहीर, आजपासून नोंदणी प्रक्रिया सुरु"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel