Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १० मार्च, २०२२, मार्च १०, २०२२ WIB
Last Updated 2022-03-09T19:00:46Z
Rojgar

शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्रांना ऑस्ट्रेलियन सरकारकडून औषधनिर्मिती पेटंट मंजूर

Advertisement
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातील वनस्पतीशास्त्रज्ञांच्या चमूला रक्ताच्या कर्करोगावरील उपचारासाठी आयुर्वेदिक औषध निर्मितीसाठी ऑस्ट्रेलियन सरकारकडून औषधनिर्मिती पेटंट मंजूर झाले आहे. विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. डी के गायकवाड आणि त्यांचे संशोधक विद्यार्थी डॉ. चिराग नारायणकर, डॉ. निवास देसाई, डॉ. मानसी पाटील (स.गा.म. कॉलेज कराड), डॉ. सागर देशमुख (न्यू कॉलेज, कोल्हापुर), डॉ. प्रतिष्ठा पवार (दा. पा. कॉलेज, कर्जत) व डॉ. उमेश पवार (पं. खे. कॉलेज, सावंतवाडी) यांना ऑस्ट्रेलिया सरकारकडून ‘सिंथेसिस ऑफ ब्लड कॅन्सर सेल ग्रोथ इनहीबीटर’ या विषयावरील औषधनिर्मितीमध्ये पेटंट मंजूर झाले आहे. रक्ताचा कर्करोग घातक आजार असून यामुळे जगभरात लाखो लोक मृत्युमुखी पडतात. या भीषण रोगाला प्रतिरोध करणाऱ्या औषधनिर्मितीसाठी जगभरातील संशोधक प्रयत्न करत आहेत. या संशोधनाचा एक भाग म्हणून शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. डी के गायकवाड आणि त्यांच्या संशोधक विद्यार्थ्यांनी रक्ताच्या कर्करोगावरील आयुर्वेदिक औषधाची निर्मिती केली आहे. या संदर्भात माहिती देताना डॉ. डी.के. गायकवाड म्हणाले, सदर औषधामध्ये निवडुंग प्रजातीच्या वनस्पतीचा अर्क वापरला आहे. या औषधातील जिवाणूरोधक गुणधर्मामुळे रक्ताच्या कर्करोगाच्या पेशींची मात्रा कमी करण्यासाठी ते प्रभावी ठरू शकते. या आयुर्वेदिक औषधाच्या मदतीने रक्ताच्या कर्करोगाच्या उपचारावर चांगला पर्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. या संपूर्ण टीमला स्तनाच्या कर्करोगावरील उपचारासाठी भारत सरकारकडून दोन पेटंट मंजूर झाले आहेत. तसेच या टीमने कर्करोगावरील संशोधनासाठी अमेरिकेकडेही पेटंटसाठी प्रस्ताव पाठवला आहे. या चमूला कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्यासह माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.


source https://maharashtratimes.com/career/career-news/shivaji-university-researchers-get-patent-for-ayurvedic-medicine-for-blood-cancer/articleshow/90108567.cms