यूपीएससीची तयारी : महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम

यूपीएससीची तयारी : महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम

|| रोहिणी शहा

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षेची योजना व पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम याबाबत आयोगाकडून जून २०२१मध्ये घोषणा करण्यात आली आहे. या लेखामध्ये वन सेवा, कृषी सेवा आणि अभियांत्रिकी सेवा या तज्ज्ञ सेवांसाठीच्या पूर्वीच्या तिन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम आणि संयुक्त पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम यांच्या विश्लेषणाच्या आधारे अभ्यासक्रमामध्ये झालेले बदल कोणते आहेत याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. 

तिन्ही तांत्रिक सेवांच्या पूर्वीच्या आणि आताच्या पूर्वपरीक्षा अभ्यासक्रमाची तुलना केली तर पुढील बाबी लक्षात येतात:

पूर्वपरीक्षेमध्ये आधीप्रमाणेच २०० गुणांसाठी १०० प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रश्नसंख्या बदलली नसली तरी कोणत्या घटकासाठी किती प्रश्न हे पूर्वीप्रमाणे नमूद केलेले नाही. त्यामुळे पहिली परीक्षा झाल्यावरच प्रत्येक घटकाचे  weightage  लक्षात येणार आहे.

मराठी व इंग्रजी भाषा घटक तिन्ही परीक्षांमध्ये समाविष्ट होते. मराठीसाठी बारावी तर इंग्रजीसाठी पदवीचा स्तरही आधीप्रमाणेच ठेवण्यात आला आहे. केवळ कृषी सेवेसाठी आधी मराठी भाषेचा स्तर शालान्त परीक्षेइतका होता तो आता बारावीप्रमाणे असेल.

तिन्ही सेवांसाठीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयांसाठी आधी प्रत्येकी २५, १५ आणि १० अशी प्रश्नसंख्या होती. आता ती १०-१० अशी होण्याची शक्यता असली तरी जास्तीत जास्त २५ प्रश्न येऊ शकतील, असे गृहीत धरून सध्या तयारी करायला हवी.

सामान्य अध्ययन हा घटक आधीच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट होता असे दिसत असले तरी सविस्तर अभ्यासक्रमाचे विश्लेषण केल्यावर त्यातील घटक विषय वेगवेगळे असल्याचे दिसून येते. त्यामुळे आधीच्या आणि आताच्या अभ्यासक्रमाची तुलना करणे तयारीसाठी उपयुक्त ठरेल.

तिन्ही सेवांसाठीच्या सामान्य अध्ययन विषयातील आधीच्या आणि आताच्या अभ्यासक्रमामध्ये झालेले बदल पुढीलप्रमाणे पाहता येतील:

  वन सेवा परीक्षा अभ्यासक्रमातील बदल

पूर्व परीक्षेमध्य सामान्य अध्ययन घटकामध्ये प्रत्येकी २५-२५ गुणांचे प्रश्न चालू घडामोडी आणि सामान्य बौद्धिक क्षमतेसाठी विचारण्यात येत असत. सामान्य अध्ययनाचा निम्मा भाग या घटकाने व्यापला होता ते प्रमाण कमी होणार आहे.

आता सामान्य अध्ययनामध्ये राज्यव्यवस्था, सामान्य विज्ञान, भूगोल आणि पर्यावरण हे नवीन घटक विषय समाविष्ट करण्यात आले आहेत. भारतीय अर्थव्यवस्था/ आर्थिक सामाजिक विकास आणि इतिहास हे घटक वगळण्यात आले आहेत.

मात्र मुख्य परीक्षेसाठी यातील भूगोल, राज्यव्यवस्था आणि पर्यावरण या घटकांचा अभ्यास केला जातच होता. त्यामुळे हे अगदीच नवीन विषय नाहीत.

भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र, दूर संवेदन, हवाई आणि ड्रोन छायाचित्रण आणि  ॅकर व त्याचे उपयोजन  आणि माहिती व दळणवळण तंत्रज्ञान हे नवीन मुद्दे अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालेले आहेत.

   कृषी सेवा परीक्षा अभ्यासक्रमातील बदल

पूर्वपरीक्षेमध्ये सर्वाधिक मदतगार ठरणारा २५ प्रश्नांचा (५० गुण) कृषी घटक वगळण्यात आला आहे.

सामान्य अध्ययनातील अर्थव्यवस्था, इतिहास घटकांबरोबरच महाराष्ट्राचे समाजसुधारक, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास घटकातील काही मुद्दे वगळण्यात आले आहेत.

सामान्य विज्ञान घटकातील माहिती व दळणवळण तंत्रज्ञान हा मुद्दा आधीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट होताच. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, दूर संवेदन, हवाई आणि ड्रोन छायाचित्रण आणि  GIS व त्याचे उपयोजन हे नवीन मुद्दे अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालेल आहेत.

सामान्य बौद्धिक क्षमता हा घटक नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.

अभियांत्रिकी सेवा परीक्षा अभ्यासक्रमातील बदल

पूर्वपरीक्षेमध्ये अभियांत्रिकी अभियोग्यता हा ६० प्रश्नांचा (१२० गुण) घटक वगळण्यात आला आहे. ६० टक्के गुणांसाठी विचारल्या जाणाऱ्या या घटकामुळे आधी सामान्य अध्ययनाची तयारी  selective पद्धतीने करणे शक्य होते, पण आता सामान्य अध्ययानाचा अभ्यास जास्त गांभीर्याने करणे आवश्यक ठरणार आहे.  सामान्य बौद्धिक क्षमता हा घटक नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.  इतिहास आणि अर्थव्यवस्था हे घटक वगळण्यात आले आहेत.

The post यूपीएससीची तयारी : महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम appeared first on Loksatta.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: यूपीएससीची तयारी : महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षा अभ्यासक्रमhttps://ift.tt/063ZknW

0 Response to "यूपीएससीची तयारी : महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel