Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, १२ मार्च, २०२२, मार्च १२, २०२२ WIB
Last Updated 2022-03-12T09:00:20Z
Rojgar

CMAT प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र कधी? जाणून घ्या अपडेट

Advertisement
Date 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, NTA) ने सीएमएटी CMAT (CMAT 2022) परीक्षेच्या तारखा जाहीर केल आहेत. परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार एनटीएच्या अधिकृत वेबसाइट cmat.nta.nic.in वर सविस्तर अपडेट पाहू शकतात. परीक्षा ९ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत घेतली जाणार आहे. एनटीएने गेल्या वर्षी CMAT २०२२ ची परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेतली होती. CMAT प्रवेश परीक्षा कॉम्प्युटर माध्यमातून (CBT) घेतली जाणार आहे. CMAT परीक्षेची नोंदणी सुरु असून उमेदवारांना १७ मार्च २०२२ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. CMAT पेपर पॅटर्ननुसार, प्रश्नपत्रिकेत एकूण १०० प्रश्न असतील. यासाठी एकूण १८० मिनिटांचा कालावधी देण्यात येईल. क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स आणि डेटा इंटरप्रिटेशन, लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन, लॉजिकल रिझनिंग, जनरल अवेअरनेस आणि इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्युअरशिपमधून प्रश्न विचारले जातील. प्रत्येक योग्य उत्तरासाठी उमेदवारांना ४ गुण मिळतील. सीएमएटी प्रवेश परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असेल. CMAT २०२२ परीक्षा तारखेच्या नोटिफिकेशननुसार, पीजीडीएम अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संस्थांद्वारे कॉमन मॅनेजमेंट एंट्रन्स टेस्ट (Common Management Entrance Test, CMAT) घेतली जाते. सहा ऑल इंडिया परीक्षांपैकी कोणतीही एक उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पीजीडीएम अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे(NTA) दरवर्षी १००० हून अधिक बी-स्कूल्सद्वारे ऑफर केलेल्या मॅनेजमेंट अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी सामान्य प्रबंधन प्रवेश परीक्षा (CMAT) आयोजित करण्याात येते. CMAT च्या आकडेवारीनुसार मागील वर्षीप्रमाणे एकूण ७४,४८६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. CMAT २०२२ ची परीक्षा देशातील १५३ शहरांमध्ये होणार आहे. राजीव गांधी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, पंजाबमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक उमेदवार CMAT २०२२ प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. CMAT स्कोअरकार्डवर विद्यापीठ एमबीए-लॉचा प्रवेश होऊ शकतो.


source https://maharashtratimes.com/career/career-news/cmat-entrance-exam-date-2022-cmat-entrance-exam-will-be-held-on-9th-april-know-when-the-admit-card-will-be-issued/articleshow/90164968.cms