CTET Result 2022: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CTET Result 2022: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CTET 2022: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (CBSE) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) निकाल जाहीर केला आहे. ही परीक्षा दिलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन निकाल पाहू शकणार आहेत. सीटीईटीची उत्तरतालिका १ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली असून त्यावर हरकती नोंदविण्यासाठी ४ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर आता निकाल जाहीर करण्यात आला आहे. CTET 2022: या स्टेप्स फॉलो करुन पाहा निकाल सीबीएसईद्वारे सीटीईटी डिसेंबर २०२१ चा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जा. होमपेजवरील लिंकवर क्लिक करा. रोल नंबर आणि इतर तपशील सबमिट करा. सीबीएसईद्वारे सीटीईटी डिसेंबर २०२१ चा निकाल स्क्रिनवर दिसेल. निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा उमेदवारांना निकाल आणि गुण पाहता येईल. सीटीईटी डिसेंबर परीक्षेचे आयजोन (CTET डिसेंबर २०२१) १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ या कालावधीत करण्यात आले. परंतु तांत्रिक कारणांमुळे १६ आणि १७ डिसेंबरच्या प्रत्येकी एका शिफ्टची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती जी १७ जानेवारी रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर पाहता येईल. सीटीईटी प्रमाणपत्राची वैधता आयुष्यभर राहते. NAD मध्ये पाहा निकाल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ मध्ये उत्तीर्ण उमेदवारांची प्रमाणपत्रे राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये (National Educational Depository) अपलोड करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ सत्रांसाठी सीटीईटी प्रमाणपत्रे एनएडी (NAD) डिजिलॉकरमध्ये अपलोड करण्यात आली होती. नोकरी मिळविताना अनेक उमेदवारांकडून खोटी प्रमाणपत्र आणि कागदपत्रांमध्ये छेडछाड केल्याच्या घटना समोर येत असतात. पण नॅशनल अॅकॅडेमिक डिपॉझिटरीमध्ये (National Academic Depository) जतन केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणतेही बदल करता येत नाही. म्हणूनच सीबीएसईने एज्युकेशन डिपॉझिटरीचा स्वीकार केला. यानंतर आयसीएसई आणि दिल्ली विद्यापीठानेही याचा वापर केला आहे. CTET परीक्षा म्हणजे काय? सीबीएसईतर्फे सीटीईटी परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार देशभरातील केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि आर्मी स्कूलमधील शिक्षकांच्या पदावर नियुक्तीसाठी अर्ज करू शकतात. सीटीईटीच्या पेपर १ मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार इयत्ता पहिली ते पाचवीमधील शिक्षक भरतीसाठी पात्र मानले जातील. तर पेपर २ मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार इयत्ता सहावी ते आठवीच्या शिक्षक भरतीसाठी पात्र असतील. सीटीईटी २०२१ परीक्षा एकूण १५० गुणांची आहे. उत्तीर्ण होण्यासाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांना CTET निकाल २०२१ मध्ये किमान ६० टक्के म्हणजेच ९० गुण मिळणे आवश्यक आहे. तसेच राखीव प्रवर्गातील (एससी, एसटी आणि ओबीसी) उमेदवारांना किमान ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/ctet-result-2022-cbse-announced-ctet-2022-exam-result-check-onctetnicin/articleshow/89828621.cms

0 Response to "CTET Result 2022: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel