Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ९ मार्च, २०२२, मार्च ०९, २०२२ WIB
Last Updated 2022-03-09T07:00:24Z
Rojgar

CTET Results 2021: विद्यार्थ्यांना संताप अनावर, निकालासंदर्भात बोर्डाला विचारले प्रश्न

Advertisement
2021: सीटीईटी निकालाची (CTET 2021 Results) वाट पाहणाऱ्या उमेदवारांची नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे. निकालाबाबत उमेदवारांकडून सोशल मीडियावर (Reaction On Social Media) सातत्याने संताप व्यक्त केला जात आहे. परीक्षा होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला असला तरी अद्याप निकाल लागला नसल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत, उमेदवारांनी आता ट्विटरवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, सीबीएसईला (CBSE) टॅग करून प्रश्न विचारले आहेत. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, सीटीईटी २०२१ (Central Teacher Eligibility Test, CTET 2021) चा निकाल कधी जाहीर होणार? आता अजून किती दिवस लागतील? असे प्रश्न विचारले जात आहेत. याच संदर्भात कुशेश्वर कुमार साहू यांनी ट्विटरवर लिहिले की, 'सीटीईटी निकाल जाहीर व्हायला किती वेळ लागेल? २ महिने झाले, आधी परीक्षा ऑफलाइन होती तेव्हा निकाल वेळेवर यायचा. आता परीक्षा ऑनलाइन झाल्याने उशीर झाला. आता खूप झाले, कृपया निकाल जाहीर करा.' यासोबतच अभि नावाच्या युजरने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत ...आणि किती उशीर? असा प्रश्न उपस्थित केला आहे. बिहारमधील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागा मार्चमध्ये केव्हाही जाहीर केल्या जाऊ शकतात. त्यामुळे निदान विलंबानंतर आमच्या निकालाच्या तात्पुरत्या तारखेबद्दल तुम्ही आम्हाला कळवायला हवे होते. CTET 2021: या स्टेप्स फॉलो करुन पाहा निकाल सीबीएसईद्वारे सीटीईटी डिसेंबर २०२१ चा निकाल अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाहीर केला जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार या पोर्टलवरील होमपेजवर सक्रिय करण्यासाठी लिंकवर क्लिक करून निकाल पाहू शकतात. उमेदवारांना या पेजवर तपशील (रोल क्रमांक इ.) सबमिट करून त्यांचा निकाल आणि गुण समजू शकणार आहेत. सीटीईटी डिसेंबर परीक्षेचे आयजोन (CTET डिसेंबर २०२१) १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ या कालावधीत करण्यात आले. परंतु तांत्रिक कारणांमुळे १६ आणि १७ डिसेंबरच्या प्रत्येकी एका शिफ्टची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती जी १७ जानेवारी रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर पाहता येईल. सीटीईटी प्रमाणपत्राची वैधता आयुष्यभर राहते. CTET परीक्षा म्हणजे काय? सीबीएसईतर्फे सीटीईटी परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार देशभरातील केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि आर्मी स्कूलमधील शिक्षकांच्या पदावर नियुक्तीसाठी अर्ज करू शकतात. सीटीईटीच्या पेपर १ मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार इयत्ता पहिली ते पाचवीमधील शिक्षक भरतीसाठी पात्र मानले जातील. तर पेपर २ मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार इयत्ता सहावी ते आठवीच्या शिक्षक भरतीसाठी पात्र असतील.


source https://maharashtratimes.com/career/career-news/ctet-results-2021-student-asking-cbse-board-on-twitter-for-date-of-result/articleshow/90092411.cms