Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ७ मार्च, २०२२, मार्च ०७, २०२२ WIB
Last Updated 2022-03-07T10:00:39Z
Rojgar

International women's Day 2022: आर्मी टेक्निकल कोअरमध्ये महिलांना प्रवेश

Advertisement
IWD 2022: महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव केला जात आहे. दरवर्षी ८ मार्च रोजी #BreakTheBias या हॅशटॅगसह आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. 'जेंडर इक्वलिटी टुडे फॉर ए सस्टेनेबल टूमारो' (Gender Equality Today for a Sustainable Tomorrow) ही यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची (International Women's Day, ) थीम म्हणून घोषित करण्यात आली आहे. याद्वारे महिलांना कामाच्या ठिकाणासह प्रत्येक क्षेत्रात समानतेतून स्थायी भविष्य निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या थीमच्या अनुषंगाने भारतीय सैन्यात विशेषत: टेक्निकल कॉर्प्समध्ये महिलांची भरती करण्यात येणार आहे. भारतीय सैन्यात (Indian Army) महिला उमेदवारांच्या प्रवेशासाठी अनेक पर्याय आहेत. शॉर्ट सर्व्हिस कमिशन ( Short Service Commission, SSC)- टेक्निकल अभ्यासक्रम हा त्यापैकी एक पर्याय आहे. भारतीय लष्कराच्या टेक्निकल कॉर्प्समध्ये प्रवेश मिळाल्यानंतर महिला उमेदवार जास्तीत जास्त १४ वर्षांच्या सेवेसह सैन्यात अधिकारी म्हणून देशाची सेवा करू शकतात. निवड प्रक्रियेअंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (OTA), चेन्नई येथे ४९ आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच दोन वर्षांनी कॅप्टन पद, सहा वर्षांनी मेजर आणि १३ वर्षांनंतर लेफ्टनंट कर्नल पदोन्नती मिळू शकते. एसएससी (टेक) साठी पात्रता आणि निवड प्रक्रिया भारतीय सैन्याच्या टेक्निकल कॉर्प्समध्ये महिलांना आर्मी एसएससी (टेक) द्वारे भरती केले जाते. उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थेतून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांना लष्कराने दिलेली वयोमर्यादा आणि शारीरिक निकष पूर्ण करावे लागतील. या प्रवेशांतर्गत निवड प्रक्रियेत कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड(SSB) च्या मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलावले जाते. या मुलाखतीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले जाते. एसएससी (टेक) साठी नोटिफिकेशन भारतीय लष्कराकडून एसएससी (टेक) चे नोटिफिकेशन भारत सरकारच्या प्रकाशन विभागाच्या साप्ताहिक रोजगार बातम्यांमध्ये वर्षातून दोनदा प्रकाशित केले जाते. याचा अभ्यासक्रम सामान्यतः एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये सुरु होतो. SAC (Tech) मधील महिला उमेदवारांना तिसाव्या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनापासून (IWD 2022) सुरू होत आहे. यासाठी महिला उमेदवार अधिकृत भरती पोर्टल joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करु शकतात.


source https://maharashtratimes.com/career/career-news/iwd-2022-promotes-the-theme-of-international-womens-day-entry-of-women-into-the-army-technical-corps/articleshow/90049453.cms