Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ७ मार्च, २०२२, मार्च ०७, २०२२ WIB
Last Updated 2022-03-07T07:00:16Z
Rojgar

JEE Main २०२२ चा अभ्यासक्रम जाहीर, व्हिडिओ लेक्चरच्या सहाय्याने करा तयारी

Advertisement
JEE Main 2022: जेईई मेन २०२२ परीक्षेची तयारी करणाऱ्या विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National testing Agency, NTA) ने वर्ष २०२२ च्या इंजिनीअरिंग प्रवेश, संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) साठी नोटिफिकेशन जाहीर करुन नोंदणी सुरु केली आहे. यासोबतच एजन्सीने प्रवेश परीक्षेच्या दोन्ही पेपरसाठी अभ्यासक्रम देखील जाहीर केला आहे . त्यानुसार पेपर १ हा BE/B.Tech प्रवेशासाठी आणि पेपर २ B.Arch साठी असेल. या वर्षीच्या परीक्षेची तयारी करत असणाऱ्या उमेदवारांना परीक्षा पोर्टल jeemain.nta.nic.in वर सक्रिय लिंक किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरुन जेईई मेन २०२२ चा अभ्यासक्रम तपासता येणार आहे. दुसरीकडे, एनटीएने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या सूचनेनुसार देशभरात चाचणी सराव केंद्रे (TPCs) तयार केली आहेत. ज्याद्वारे जेईई मेन २०२२ ची तयारी करणारे उमेदवार परीक्षा देऊ शकतील. तसेच प्रश्नांचे स्वरूप, कॉम्प्युटर आधारित प्रश्न (CBT)याबद्दल सविस्तर माहिती मिळवू शकतील. एनटीएने जाहीर केलेल्या माहितीनुसार, ज्या उमेदवारांकडे जेईई मेनची तयारी करण्यासाठी मर्यादित संसाधने असलेल्या उमेदवारांना एनटीएच्या टीपीसी सुविधा मोफत पुरवल्या जाणार आहेत. TPCs विशेषतः ग्रामीण भागात आणि देशातील दुर्गम भागातील उमेदवारांसाठी तयार केले गेले आहेत. याव्यतिरिक्त, एनटीए जेईई मेन २०२२ च्या तयारीसाठी विनामूल्य ऑनलाइन व्हिडिओ लेक्चर देखील आयोजित करण्यात येत आहे. ज्यात उमेदवार एनटीएच्या अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर जाऊन प्रवेश घेऊ शकतात. विविध आयआयटीमधील प्राध्यापक आणि विषय तज्ञांनी ही व्हिडीओ लेक्चर तयार केली आहेत. उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंकवरून जेईई मेन २०२२ मोफत व्हिडिओ लेक्चर्स पेजवर जाऊ शकतात. जेईई मुख्य परीक्षेचा पॅटर्न जेईई मेन २०२२ च्या परीक्षेच्या पॅटर्ननुसार, बी.आर्कसाठी ड्रॉईंग चाचणी वगळता दोन्ही पेपर ऑनलाइन कॉम्प्युटर आधारित पद्धतीने आयोजित केले जातील. पेपर १ साठी, प्रत्येक विषयामध्ये २० एकाधिक निवड प्रश्न (MCQ) आणि १० संख्यात्मक मूल्याचे प्रश्न असतात आणि जेईई मेन २०२२ परीक्षेच्या पॅटर्ननुसार १० पैकी फक्त ५ प्रश्न परीक्षचे माध्यम-कॉम्प्युटर आधारित परीक्षा परीक्षेची वेळ - तीन तास परीक्षेची भाषा- इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, मल्याळम, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू. प्रश्न प्रकार- एकाधिक निवड प्रश्न (MCQ) विभाग- तीन विभाग आहेत (१) गणित (२) भौतिकशास्त्र (३) रसायनशास्त्र


source https://maharashtratimes.com/career/career-news/jee-main-2022-jee-main-syllabus-released-candidates-from-rural-areas-should-prepare-with-ntas-free-video-lectures/articleshow/90045131.cms