Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ८ मार्च, २०२२, मार्च ०८, २०२२ WIB
Last Updated 2022-03-08T09:48:34Z
करिअर वृत्तान्त – LoksattacareerResults

RBI मध्ये बंपर भरती, अर्ज करण्याची आज शेवटची संधी

Advertisement

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या विविध कार्यालयांमध्ये सहाय्यकांच्या ९५० जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया ८ मार्च म्हणजेच आज बंद होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही ते आता सेंट्रल बँकेच्या वेबसाइट rbi.org.in वर नोंदणी करू शकतात. त्याच वेळी, अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिक माहितीसाठी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

बँकेच्या विविध कार्यालयांमध्ये सहाय्यकांच्या ९५० जागा भरण्यासाठी १७ फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवार अर्ज करण्यासाठी किमान ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.

वयोमर्यादा काय?

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे. याशिवाय राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सवलत दिली जाईल.

(हे ही वाचा: Recruitment 2022: बँकेत पदवीधरांसाठी नोकरीची संधी! पगार ८९ हजारांहून अधिक)

निवड प्रक्रिया कशी असेल?

सहाय्यक पदासाठीची परीक्षा टप्प्याटप्प्याने घेतली जाईल. प्राथमिक, मुख्य आणि नंतर भाषा प्राविण्य चाचणी होईल. अधिक माहितीसाठी उमेदवार बँकेच्या http://www.rbi.org.in वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

(हे ही वाचा: India Post Recruitment 2022: दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी; जाणून घ्या अधिक)

परीक्षेची तारीख काय?

आरबीआय सहाय्यक पदासाठी ऑनलाइन प्राथमिक परीक्षा २६ आणि २७ मार्च रोजी घेतली जाईल. सध्या या तारखा तात्पुरत्या आहेत. मुख्य परीक्षा मे २०२२ मध्ये होणार आहे.

(हे ही वाचा: Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात अधिकारी पदांसाठी भरती, महिला देखील करू शकतात अर्ज)

आवश्यक माहिती

आरबीआय सहाय्यक परीक्षा अर्ज भरण्यात कोणतीही अडचण आल्यास, उमेदवारांच्या तक्रारी निवारण कक्षाकडे cgrs.ibps.in वर चौकशी केली जाऊ शकते.

The post RBI मध्ये बंपर भरती, अर्ज करण्याची आज शेवटची संधी appeared first on Loksatta.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: RBI मध्ये बंपर भरती, अर्ज करण्याची आज शेवटची संधीhttps://ift.tt/hZc5d2P