Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ५ मार्च, २०२२, मार्च ०५, २०२२ WIB
Last Updated 2022-03-05T09:43:15Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

SSC : एसएससी एमटीएस टियर 1 चा निकाल जाहीर, 44680 विद्यार्थी टियर 2 साठी पात्र Rojgar News

Advertisement
SSC Tier 1 Result

SSC MTS tier 1 Result 2020 नवी दिल्ली: स्टाफ सिलेक्शन कमिशननं (SSC) एसएससी एमटीएस टियर 1 निकाल (SSC MTS tier 1) जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल ऑनलाईन पद्धतीनं जारी करण्यात आला आहे. एसएससी एमटीएस टियर 1 परिक्षेत 44680 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. टियर 1 परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार त्यांच्या निकाल तपास शकतात. एसएससीची अधिकृत वेबसाईट ssc.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहता येईल. एसएससी एमटीएस चा निकाल पीडीएफमध्ये जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थी त्यामध्ये त्यांचा निकाल पाहू शकतात. स्टाफ सिलेक्शन कमिशननं यशस्वी विद्यार्थ्यांना टियर 2 च्या परीक्षेत सहभागी व्हावं लागेल. टियर 1 च्या पेपरमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल 14 मार्च रोजी पाहता येतील. टियर 2 च्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी स्टाफ सिलेक्शनं कट ऑफ देखील जारी केली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशननं विद्यार्थ्यांना निकाल 14 मार्च रोजी उपलब्ध होतील, असं सांगितलं आहे.

अंतिम उत्तर तालिका 14 मार्चला उपलब्ध होणार

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून एसएससी एमटीएस 2021 ची अंतिम उत्तर तालिका 14 मार्चला जाहीर केली जाईल. एसएससी एमटटीएस 202 टियर 1 मध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना टियर 2 च्या परीक्षेत सहभागी व्हावं लागेल. एसएससी एमटीएस टियर 2 परीक्षा ही दिर्घोत्तरी स्वरुपाची असेल.

निकाल कसा पाहायचा?

स्टेप 1 : स्टाफ सिलेक्शन कमिशनची वेबसाईट ssc.nic.in ला भेट द्या.
स्टेप 2 : होमपेजवरील Multi Tasking (Non-Technical) Staff Examination 2020 वर क्लिक करा.
स्टेप 3 : SSC MTS 2020-21च्या निकालाची पीडीएफ फाईल असेल, त्यावर क्लिक करा
स्टेप 4 : यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्या पीडीएफममध्ये तुमचा परीक्षा क्रमांक सर्च करा
स्टेप 5 : परीक्षेच्या पुढील टप्प्यावरील उपयोगासाठी पीडीएफ सेव्ह करुन ठेवा.

टियर 2 मधील पेपरचं स्वरुप?

एसएससी एमटीएस परीक्षा पॅटर्ननुसार भारतीय संविधानाच्या 8 व्या अनूसूचीनुसार विद्यार्थ्यांना इंग्रजी किंवा इतर कोणत्याही भाषेत निबंध लिहावा लागेल. पेपर क्रमांक 2 साठी 50 गुण निश्चित करण्यात आले आहेत. SSC MTS परीक्षा केंद्र सरकारच्या विविध विभागात मल्टी टास्किंग स्टाफच्या नियुक्तीसाठी आयोजित करण्यात आली आहे. एसएससीद्वारे जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार एमटीएस परीक्षा 2020 पेपर क्रमांक दोन संदर्भातील माहितीपत्रक वेबसाईटवर जारी करण्यात येईल. टियर 2 परीक्षेच्या तारखा सात दिवस अगोदर जाहीर केल्या जातील. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र एसएससीच्या प्रादेशिक विभागाच्या वेबसाईटवर जारी करण्यात येतील, काही अडचणी आल्यास विद्यार्थी प्रादेशिक कार्यालयात भेट देऊ शकतात.

इतर बातम्या:

ज्योतिषाचं काम घ्यावं इतकी माझी वाईट अवस्था नाहीये; शरद पवारांचा नेमका टोला कुणाला?

फडणवीस असताना फोन टॅपिंगच्या घटना घडल्या, किंमत अधिकाऱ्यांना चुकवावी लागेल: शरद पवारांचा इशारा


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: SSC : एसएससी एमटीएस टियर 1 चा निकाल जाहीर, 44680 विद्यार्थी टियर 2 साठी पात्रhttps://ift.tt/WTVagLB