Ukraineमधून परतणारे विद्यार्थी भारतात MBBS पूर्ण करू शकतील? जाणून घ्या प्लान

Ukraineमधून परतणारे विद्यार्थी भारतात MBBS पूर्ण करू शकतील? जाणून घ्या प्लान

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतीय विद्यार्थी देशात परतू लागले आहेत. भारतात चांगल्या वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्याने, शुल्क जास्त असल्याने त्यांनी युक्रेनचा मार्ग पकडला पण आता भारतात परतणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा पूर्ण होणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. रशियाचा बॉम्ब हल्ल्याने युक्रेन बेचिराख होत आहे. अशावेळी भारतीय विद्यार्थी युक्रेनियन विद्यापीठात परतू शकले नाहीत तर त्यांना पदवी कशी आणि कोठून मिळेल? या प्रश्नाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न तयार होतोय. तसेच भारतातील कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकेल का? या प्रकरणी मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया (MCI) आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या तरतुदी काय आहेत? या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार काय नियोजन करत आहे? यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. नॅशनल मेडिकल कमिशनचे (NMC) फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स (FMG) चे नियम अतिशय कडक आहेत. परदेशात शिकणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना भारतात येऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करता येईल अशी कोणतीही तरतूद सध्या नाही. विद्यार्थ्यांना इतर देशातून किंवा विद्यापीठातून एमबीबीएस पूर्ण करतानाही अडचणी येतात. पण सध्याच्या परिस्थितीत भारत सरकार आणि आरोग्य मंत्रालय हे नियम शिथिल करणार का? हा महत्वाचा प्रश्न आहे. नियम शिथिल करण्याची शक्यता अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोग फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट लायसन्सिंग (FMG) चे नियम शिथिल करण्याची शक्यता पडताळून पाहिली जात आहे. युक्रेनमधून परतलेले वैद्यकीय विद्यार्थी भारतातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयातून अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात की नाही? या पर्यायाचाही विचार केला जात आहे. एनएमसी, आरोग्य मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय (MEA) आणि नीती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी या विषयावर लवकरच आढावा बैठक घेणार आहेत. सध्याच्या परिस्थितीत मानवतावादी आधार आणि संवेदनशीलता दाखवून पर्याय शोधले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्याचे नियम काय? सध्या नॅशनल मेडिकल कमिशनच्या फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट लायसन्स रेग्युलेशननुसार, भारताबाहेर वैद्यकशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच संस्थेतून संपूर्ण अभ्यासक्रम, प्रशिक्षण आणि इंटर्नशिप करणे बंधनकारक आहे. अर्थात सुरु असलेल्या अभ्यासक्रम सोडून हे विद्यार्थी भारतातून किंवा इतर कोणत्याही देशातून वैद्यकीय इंटर्नशिपचे प्रशिक्षण घेऊ शकत नाहीत. सध्या असा कोणताही नियम नाही ज्या अंतर्गत परदेशात शिकणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या मध्यभागी भारतातील कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा. मात्र, अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेऊन संवेदनशीलतेने निर्णय घेतला जाऊ शकतो. याबाबत आरोग्य मंत्रालय आणि महापालिकेत चर्चा सुरु आहेत.


source https://maharashtratimes.com/career/career-news/russia-ukraine-war-students-returning-from-ukraine-will-be-able-to-complete-mbbs-in-india-know-what-is-the-plan-of-the-ministry-of-health/articleshow/90007947.cms

0 Response to "Ukraineमधून परतणारे विद्यार्थी भारतात MBBS पूर्ण करू शकतील? जाणून घ्या प्लान"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel