Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ७ मार्च, २०२२, मार्च ०७, २०२२ WIB
Last Updated 2022-03-07T08:00:13Z
Rojgar

Ukraine Return Students: युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आता सुप्रीम कोर्टात

Advertisement
रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनमधून जीव वाचवून भारतात परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात (Plea in Supreme Court on Ukraine Return Medical Students) दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत युक्रेनमधून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना भारतीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये योग्य भारतीय किंवा परदेशी पदवी कार्यक्रमांतर्गत सामावून घेण्यासाठी केंद्र सरकार आणि इतर संबंधित घटकांना निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी युक्रेनमधील अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा, असे जनहित याचिकामध्ये म्हटले आहे. पर्यायाने या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय, राज्य किंवा खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील काही जागा युक्रेनियन संस्थांचे परदेशी कॅम्पस म्हणून घोषित करून अभ्यास सुरू ठेवण्याची व्यवस्था केली पाहिजे. युद्धग्रस्त देशातील परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत हे आपत्कालीन उपाय म्हणून केले जाऊ शकते, असे त्यात म्हटले आहे. दोन वकिलांनी ही याचिका दाखल केली आहे. हे भारतीय विद्यार्थ्यांच्या भविष्यावर निर्माण होणाऱ्या संकटावर प्रकाश टाकते. युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना युद्धाच्या परिस्थितीमुळे त्यांचे वैद्यकीय अभ्यासक्रम अर्धवट सोडण्यास भाग पाडले गेले आहे. याचिकेत म्हटले आहे की युक्रेनमध्ये केव्हा सामान्य स्थिती पूर्ववत होईल आणि विद्यार्थी त्यांचे अभ्यासक्रम पूर्ण करू शकतील की नाही याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. ४ मार्च रोजी सुप्रीम कोर्टाने युक्रेन-रोमानिया सीमेजवळ अडकलेल्या काही भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी केली होती. सुनावणीदरम्यान, केंद्र सरकारने असा दावा केला की त्यांनी आतापर्यंत १७ हजार भारतीय विद्यार्थ्यांना संघर्ष क्षेत्रातून बाहेर काढले आहे. त्यादरम्यान, न्यायालयाने केंद्राला युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थी आणि कुटुंबांसाठी ऑनलाइन हेल्पलाइन सुरू करण्याचे निर्देश दिले होते.


source https://maharashtratimes.com/career/career-news/plea-in-sc-seeks-directions-to-accommodate-medical-students-returning-from-ukraine-in-indian-colleges/articleshow/90045551.cms