TICKER
6/recent/my%20zone
Header Ads Widget
Responsive Advertisement
Important days in 24th April : 24 एप्रिल दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
Important days in 24th April : एप्रिल महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 24 एप्रिलचे दिनविशेष.
1896 : रसाळ लेखन करणारे कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचा जन्म.
रघुनाथ दिघे हे मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार होते. ग्रामीण जीवनाच्या पार्श्वभूमीवरील लिहिलेल्या कादंबऱ्यांसाठी ते परिचित आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांत वर्णिलेले कोकणातील जीवन, शेतकरी आणि आदिवासींची दुःखे, त्यांच्या व्यथा-वेदना वेशीवर टांगणारे होते.
1942 : नाट्यसंगीत, गायक आणि अभिनेते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे निधन.
मास्टर दीनानाथ मंगेशकर हे प्रख्यात मराठी गायकनट होते. श्रीमत् शंकराचार्यांनी दीनानाथांना ‘संगीत रत्न’ म्हणून गौरवले. दीनानाथांच्या सुरूवातीच्या ‘किंकिणी’ आणि पुढे ‘कालिंदी’ (पुण्यप्रभाव) ‘लतिका’ (भावबंधन) ‘पद्मावती’ (उग्रमंगल) ‘तेजस्विनी’ (रणदुंदुभी) वेगळ्या घाटणीचा ‘धैर्यधर’ (मानापमान) ‘सुलोचना’ (संन्यस्त खड्ग) ‘गोतम’ (ब्रह्मकुमारी) ‘शिंवागी’ (राजसंन्यास) इ. स्त्री-पुरूष भूमिका आणि त्यांची वेगळ्या शैलीची तडफदार गाणी नाट्यरसिकांना वेड लावून गेली. त्यांची ‘सुहास्य तुझे मनासि मोही’ या  चित्रपटातील गाणी अतिशय लोकप्रिय झाली.
1973 : भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा जन्म.
1990 : अंतराळात हबल ही दुर्बीण सोडण्यात आली.
1993 : 73 वी घटनात्मक दुरुस्ती, पंचायत संस्थांना घटनात्मक संरक्षण
भारतीय लोकशाही व्यवस्थेत विकेंद्रीकरण आणि जनसहभाग वाढवण्याच्या दृष्टीने ७३वी घटनादुरुस्ती कायदा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. या कायद्याची अंमलबजावणी होऊन आता दोन दशकांहून अधिक काळ लोटला आहे. तेव्हा निश्चितपणे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये हा घटक महत्त्वाचा आहे. 1993 पासून भारतातील स्थानिक शासनसंस्थाना घटनात्मक अधिष्ठान प्राप्त झालेले आहे. 1992 मध्ये 73वी घटनादुरुस्ती संमत झाली आणि तिच्या प्रत्यक्ष कार्यवाहीस 24 एप्रिल 1993 पासून सुरुवात झाली.
1994 : पद्मभूषण पुरस्कार विजेते उद्योगपती, शंतनुराव किर्लोस्कर यांचे निधन.
शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर हे मराठी, भारतीय उद्योजक होते. किर्लोस्कर समूहाच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. किर्लोस्कर समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर हे त्यांचे वडील होते. व्यापार आणि उद्योग क्षेत्रांतील त्यांच्या योगदानाची दखल घेत भारतीय केंद्रशासनाने इ.स. 1965 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले. तसेच त्यांना फाय फाउंडेशन, इचलकरंजी यांच्यातर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला.
महत्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/B5rtxOk Days in April 2022 : एप्रिल महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
<a href="https://ift.tt/GPwjatd days in 22nd April : 22 एप्रिल दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटनांचा आढावा
<a href="https://ift.tt/7lYbi6c days in 23st April : 23 एप्रिल दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Important days in 24th April : 24 एप्रिल दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटनाhttps://ift.tt/BpRw2Ao
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या