Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २८ एप्रिल, २०२२, एप्रिल २८, २०२२ WIB
Last Updated 2022-04-27T22:48:12Z
careerLifeStyleResults

Important days in 28th April : 28 एप्रिल दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

Advertisement

Important days in 28th April : एप्रिल महिना सुरु आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 28 एप्रिलचे दिनविशेष.

1740 : पहिले बाजीराव यांचे निधन.

दुसरे पेशवा आणि मराठेशाहीतील एक श्रेष्ठ सेनानी. बाजीरावांचे मूळ नाव विसाजी. पहिले बाजीराव किंवा थोरले बाजीराव या नावांनीही ते इतिहासात प्रसिद्ध आहेत. सन 1740 साली मराठा साम्राज्याचे शासक आणि पेशवे घराण्यातील वीर योद्धा थोरले बाजीराव पेशवे उर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचे नर्मदा नदीच्यातिरी रावेरखेड या ठिकाणी निधन झाले.

1916 : भारतात होमरूल चळवळीची स्थापना केली.

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक सनदशीर शांततापूर्ण आंदोलन छेडणारी संघटना (संघ) . ‘होमरूल’चा शब्दशः अर्थ स्वराज्य असा असून या काळात भारताच्या राजकीय नेतृत्वात एक प्रकारची शिथिलता आली होती. या वेळी ॲनी बेझंट यांनी राजकीय उन्नतीसाठी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि 25 सप्टेंबर 1916 रोजी होमरूल लीगची मद्रासमध्ये स्थापना केली. आयर्लंडमध्ये 1908–13 दरम्यान होमरूलची चळवळ चालू होती. त्यामुळे त्यांना भारतातही स्वराज्यासाठी अशीच चळवळ सुरू करावी, असे वाटले. म्हणून त्यांनी भारतातील चळवळीला ‘होमरूल लीग’ हे नाव दिले. पहिली होमरूल चळवळ टिळकांनी बेळगाव येथे स्थापन केली, तर त्याच वर्षी (1916) अड्यार (मद्रास) येथे डॉ.ॲनी बेझंट यांनी त्यांची लीग स्थापन केली. 1916 ते 1918 पर्यंत सुमारे दोन वर्ष ही चळवळ सुरू राहिली.

1931: प्रसिद्ध मराठी साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा जन्म.

मधु मंगेश कर्णिक हे प्रसिद्ध मराठी साहित्यिक होते. त्यांनी कथा, कादंबरी आणि ललितगद्य या वाड्मयप्रकारात विपुल निर्मिती केली. याबरोबरच कविता, नाटक ,चरित्र आणि आत्मचरित्र हे वाड्म़यप्रकारही हाताळले. मधू मंगेश कर्णिकांची माहिमची खाडी, भाकरी आणि फूल आणि संधिकाल या कादंबऱ्या मराठी कादंबरी परंपरेत महत्त्वाच्या ठरतात. केंद्र शासनाच्या पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरविण्यातदेखील आले होते.

1943: नेताजी सुभाषचंद्र बोस जर्मनीहून जपान दौऱ्यावर असताना मादागास्करजवळील जर्मन पाणबुडीतून जपानी पाणबुडीवर चढले.

1992 : ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचे निधन.

डॉ. विनायक कृष्ण गोकाक हे प्रसिद्ध कन्नड कवी, नाटककार, साहित्यसमीक्षक आणि शिक्षणतज्ञ होते. त्यांचे काव्यलेखन ‘विनायक’ ह्या नावाने प्रसिद्ध आहे. बेल्जियम येथील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनास भारताचे प्रतिनिधी (1960), ‘केंब्रिज कॉन्फरन्स ऑन टीचिंग ऑफ इंग्लिश लिटरेचर’ला भारताचे प्रतिनिधी (1966) इ. बहुमानही त्यांना लाभले.1960 मध्ये त्यांना ' दिवा पृथ्वी ' या कवितासंग्रहासाठी साहित्य अकादमी ( कन्नड ) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ते पाचवे लेखक होते.

2008 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने PSLV-C9 लाँच करून नवा इतिहास रचला.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/1IiPx2C days in 27th April : 27 एप्रिल दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

<a href="https://ift.tt/MNnVpGX days in 25th April : 25 एप्रिल दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

<a href="https://ift.tt/iYGCyv4 Days in April 2022 : एप्रिल महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Important days in 28th April : 28 एप्रिल दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटनाhttps://ift.tt/2QNnRLD