Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ४ एप्रिल, २०२२, एप्रिल ०४, २०२२ WIB
Last Updated 2022-04-04T08:43:12Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

NEET : NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा रद्द, प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक लवकरच होणार जाहीर Rojgar News

Advertisement
NEET प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक लवकरच होणार जाहीर

नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी घेण्यात येणारी नीट युजी (NEET UG Exams) प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी होणारी ही युजी परीक्षा जुलैमध्ये आयोजित केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे आयोजित करण्यात येते. NTA लवकरच यासंदर्भातली अधिकृत सुचना जारी करू शकतं. परीक्षार्थींनी या संदर्भातील्या माहितीसाठी आणि अधिकृत सुचनेसाठी nta.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. एजन्सीकडून वेळापत्रक जाहीर झाल्यावर नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अंडर ग्रॅज्युएटची (National Eligibility cum Entrance Test, NEET UG 2022) रजिस्ट्रेशन प्रोसेस पासून ते काउन्सिलिंग पर्यंतची सगळी
माहिती अधिक स्पष्ट होईल.

नीट युजीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी नीटच्या अधिकृत वेबसाईट वर neet.nta.ntc.in जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करू शकतात. रजिस्ट्रेशन संदर्भातील स्टेप्स अधिकृत वेबसाईटवर दिल्या जातील.

वयोमर्यादा रद्द

नॅशनल मेडिकल कमिशनने NMC ने नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा रद्द केली.
आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही वयोमर्यादा 25 तर राखीव प्रवर्गासाठी 30 वर्षे होती. आता हीच वयोमर्यादा नॅशनल मेडिकल कमिशनकडून रद्द करण्यात आली आहे.

NEET UG 2022 : या जागांवर प्रवेश उपलब्ध असतील

मीडिया रिपोर्ट्स नुसार, नीट युजी परीक्षा द्वारे एमबीबीएस 90,825, बीडीएस 27,894, आयुष 52,720, बीवीएससी आणि एएच 603 जागांवर प्रवेश दिला जातो. यांत 1,899 एम्स आणि 249 जिपमर जागांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी आणि रजिस्ट्रेशन प्रक्रियेच्या डिटेल्ससाठी वेबसाईटला भेट देत रहावी.

या कागदपत्रांची गरज पडू शकते

– विद्यार्थ्याच्या पासपोर्ट आणि पोस्टकार्ड साईज फोटोची स्कॅन केलेली कॉपी

– 10 वी आणि 12 वी चं मार्कशीट

– विद्यार्थ्याची सही ( स्कॅन केलेली )

– विद्यार्थ्याचा डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा ( स्कॅन केलेला )

– वैध सरकारी ओळखपत्र ( आधार कार्ड, पैन कार्ड, वोटर आयडी कार्ड, ड्रायविंग लायसन्स इ. )

नीट युजी 2022 चं कन्फर्मेशन पेज लवकरच डिजिलॉकर वर जाहीर केलं जाईल. कन्फर्मेशन पेजवर साइन अप करण्यासाठी विद्यार्थ्याला डिजिलॉकर ॲप किंवा त्याची अधिकृत वेबसाईट digilocker.gov.in वर जाता येईल. विद्यार्थी डिजिलॉकर ॲप्लिकेशन वर जाऊन सहज साइन अप करू शकतात.

संबंधित बातम्या :

Beed | कांदा चिरताना आईच्या डोळ्यातलं पाणी असह्य झालं.. स्मार्ट चाकूच बनवला, बीडच्या Junior Scientist ची गोष्ट वाचाच

PM Modi | Online च्या जमान्यात हजारो Disturbance , पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला विद्यार्थ्याना थेट उपाय!

यूपीएससीच्या परीक्षार्थींना मोठा दिलासा; मुख्य परिक्षेसाठी आणखी एक संधी द्या; सुप्रीम कोर्टाचे यूपीएससीला निर्देश

 

 

 


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: NEET : NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा रद्द, प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक लवकरच होणार जाहीरhttps://ift.tt/0i5y19c