TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

11th May 2022 Important Events : 11 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

11th May 2022 Important Events : मे महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 11 मे चे दिनविशेष.

1502 : ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या चौथ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला.

1857 : 1857 चा राष्ट्रीय उठाव – भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.

भारतीयांनी 1857 मध्ये इंग्रजी सत्तेविरुद्ध केलेला उठाव. काही इतिहासकार या उठावास बंड म्हणतात, तर काही त्यास स्वातंत्र्ययुद्ध म्हणून गौरवितात. 1857 च्या उठावामागे राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक आणि लष्करी अशी अनेकविध कारणे होती. 1857 च्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत डमडम आणि बराकपूर येथे काडतूस-प्रकरणावरून गडबड झाली. मीरत येथील शिपायांनी नवी काडतुसे वापरण्याचे नाकारल्यामुळे त्यांना कैद केले गेले. शिपायांनी सरकारी इमारती जाळण्यास सुरुवात केली. 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे आणि इंग्रज अधिकारी ह्यांच्यात चकमक झाली. मंगल पांडे यास पकडून 8 एप्रिल 1857 रोजी फाशी देण्यात आले. येथूनच उठावास सुरुवात झाली. आणि उत्तरेत उठावातील लोकांनी प्रथम 11 मे 1957 रोजी दिल्ली ताब्यात घेतली.

1888 : ज्योतिबा फुले यांना 'महात्मा' ही पदवी देण्यात आली.

मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांना सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांनी 'महात्मा' ही पदवी दिली. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे.

1951 : राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी नव्याने बांधलेल्या सोमनाथ मंदिराचे उद्घाटन केले.

1960 : अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म.

गणेशकुमार नरवाडे उर्फ सदाशिव अमरापूरकर हे एक मराठी नाट्य अभिनेते तसेच हिंदी, मराठी, ओरिया, हरियाणी, भोजपुरी, बंगाली आणि गुजराती भाषांतील चित्रपटांत काम करणारे अभिनेते होते. सडक या हिंदी चित्रपटात केलेल्या महाराणी या तृतीयपंथी खलनायकाच्या भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला होता. इश्क, एलान-ए-जंग, कुली नंबर 1 यांसारखे त्यांचे चित्रपट अनेक गाजले.

1998 : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन

1998 साली आजच्याच दिवशी भारताने केलेल्या अणुचाचणीने आपल्या तंत्रज्ञानातील प्रगती जगाला दिसून आली. पोखरण अणुचाचणीची घटना साजरी करण्यासाठी 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/GU4yo5m May 2022 Important Events : 8 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

<a href="https://ift.tt/LGItMiB May 2022 Important Events : 5 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

<a href="https://ift.tt/2bUqMsl Days in May : मे महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: 11th May 2022 Important Events : 11 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटनाhttps://ift.tt/PLBxWJE

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या