TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

14th May 2022 Important Events : 14 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

14th May 2022 Important Events : मे महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 13 मे चे दिनविशेष.

1984 : फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा जन्म
फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा जन्म 14 मे 1 9 84 रोजी न्यूयॉर्कच्या व्हाईट प्लेन्स येथे झाला. मार्क झुकेरबर्ग यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकची स्थापना केली. साइटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी चौदा वर्षानंतर हार्वर्ड सोडले.

1981 : भारतीय संगणक शास्त्रज्ञ प्रणव मिस्त्री यांचा जन्म
प्रणव मिस्त्री हे भारतीय संगणक शास्त्रज्ञ आहेत. ते सिक्स्थ सेन्स (संगणक प्रणाली), सॅमसंग गॅलेक्सी गियर आणि प्रोजेक्ट बियॉन्ड वरील त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत. मिस्त्री यांना 2013 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे यंग ग्लोबल लीडर म्हणून गौरविण्यात आले. त्यांचा जन्म गुजरातमधील पालनपूर येथे 14 मे 1981 रोजी झाला. त्यांनी निरमा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली, त्यानंतर डिझाइनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई (IIT-B) मध्ये गेले.

1912 : विनोदसम्राट वसंत शिंदे  यांचा जन्म
वसंत शिंदे यांचा जन्म 14 मे 1912 रोजी भंडारदरा येथे झाला. त्यांना चित्रकलेचे ज्ञान आहे हे लक्षात आल्यानंतर दादासाहेब फाळके यांच्या स्टुडिओत पेंटिंग खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. स्टुडिओतील इतर कामांबरोबरच आपल्याकडील सर्व माणसांना अभिनय, नाच, गाणे असे सर्व काही आले पाहिजे, असा फाळके यांचा आग्रह असे. उपजत मिश्कील स्वभावाची देणगी लाभलेला हा कलाकार दादासाहेब फाळके यांच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. 1925 मध्ये फाळके यांनी निर्माण केलेल्या ‘चतुर्थीचा चंद्र’ या मूकपटात वसंत शिंदे यांना गणपतीची भूमिका मिळाली. ती त्यांनी उत्तम वठली. त्यानंतर ‘सीतावनवास’, ‘राम-रावण युद्ध’ या मूकपटांतील वानर, ‘संत जनाबाई’मध्ये लहानगा विठ्ठल, ‘भक्त प्रल्हाद’मध्ये राक्षसपुत्र, ‘बोलकी तपेली’मध्ये भटजीचा मुलगा अशा भूमिका वसंत शिंदे यांनी केल्या. अगदी लहानपणापासूनच आपल्या अभिनयाची लखलखीत मुद्रा ते उमटवू लागले.

1657 : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती
छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा जन्म 14 मे 1657 रोजी झाला. संभाजी राजांनी औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज दिली. परंतु, फितुरीमुळे संभाजी राजांना पकडण्यात आले. 14 मे 1689 रोजी संभाजी महाराज यांचे निधन झाले.

1923 : कायदेपंडित समाजसुधारक सर नारायण गणेश चंदावरकर यांचे निधन
सर नारायण गणेश चंदावरकर यांचा जन्म कर्नाटक 2 डिसेंबर 1855 रोजी झाला. ते अखिल भारतीय कॉंग्रेसच्या मूळ संस्थापकांपैकी एक होते. शिवाय ते कायदेपंडित आणि समाजसुधारक देखील होते. त्यांचे निधन 14 मे 1923 रोजी झाले.

1926 : आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉ. इंदुताई पटवर्धन यांचे निधन
ज्येष्ठ समाजसेविका डॉ.इंदुताई पटवर्धन यांनी  कुष्ठरोग्यांसाठी काम करणाऱ्या आनंदग्राम या संस्थेची स्थापना केली. त्यांचा जन्म 14 मे 1926 रोजी झाला आणि मृत्यू 8 फेब्रुवारी 1999 रोजी झाला.

2013 : भारतीय लेखक असगरअली इंजिनिअर यांचे निधन
असगरअली इंजिनिअर यांचा जन्म 10 मार्च 19 39 रोजी झाला.  ते एक सुधारणावादी भारतीय लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आणि इस्लामचे उदारमतवादी भाष्यकार म्हणून प्रसिद्ध होते. उदारमतवादी इस्लामच्या मांडणीसाठी ते जगभर ख्यातकीर्त होते. बोहरा धर्मगुरूविरोधात बंड करून त्यांनी बोहरी पंथीयात सुधारणा घडवून आणण्यासाठी मोठी चळवळ राबवली. त्यांनी प्रोग्रेसिव्ह दाऊदी बोहरा चळवळीचे नेतृत्व केले. महाराष्ट्रात डॉ. मोईन शाकीर आणि प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्यासोबत त्यांनी काम केले. त्यांचा मृत्यू  14 मे 2013 रोजी झाला.

1978 : नाटककार व लेखक  जगदीश चंद्र माथूर यांचे निधन
जगदीशचंद्र माथुर यांचा जन्म 16 जुलै 1917 रोजी उत्तर प्रदेश मध्ये झाला. ते एक हिंदी नाटककार व एकांकिका लेखक होते. त्यांचे निधन 14 मे 1978 रोजी झाला.

1998: हॉलिवूड मधील अभिनेते व गायक फ्रँक सिनात्रा यांचे निधन

1963 : भाषाशास्त्रज्ञ आणि राजकीय नेते डॉ.रघू वीरा यांचे निधन

1997: देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची साखर आयुक्त कार्यालयात सहकार कायदा कलम चारखाली नोंदणी झाली. इंदिरा गांधी भारतीय मिहिला विकास सहकारी साखर कारखाना असे त्याचे नाव आहे.

1963 : कुवेतचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश

1960 : एअर इंडिया ची मुंबई - न्यूयॉर्क विमानसेवा सुरू झाली

1955 : सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांचा वीस वर्षांचा परस्पर संरक्षणासाठीचा वॉर्सा करार पोलंडमधील वॉर्सा झाला.

1940 : दुसरे महायुद्ध : हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली

1607: ब्रिटिशांनी उत्तर अमेरिकेत त्यांचा पहिला स्थायी तळ स्थापन केला. त्याचे नाव बदलून जेम्स टाउन, व्हर्जिनिया असे ठेवण्यात आले.

1610: फ्रान्समध्ये हेन्री IV ची हत्या झाली आणि लुई XIII फ्रान्सच्या सिंहासनावर बसला.

1702: इंग्लंड आणि नेदरलँड्सने फ्रान्स आणि स्पेनविरुद्ध युद्ध घोषित केले.

1811: पॅराग्वे स्पेनपासून स्वतंत्र झाला.

1878: रॉबर्ट ए. चेसब्रो यांनी प्रथम व्हॅसलीन ब्रँड नावाची नोंदणी केली.

१८७९: थॉमस एडिसन युरोपच्या एडिसन टेलिफोन कंपनीत सामील झाला.

1944: ब्रिटीश सैन्याने कोहिमा ताब्यात घेतले.

१९४८: इस्रायलने ब्रिटनपासून स्वातंत्र्य घोषित केले.

वॉर्सा करारावर स्वाक्षरी : सोव्हिएत युनियन आणि त्याच्या पूर्व युरोपातील मित्र राष्ट्रांनी पोलंडची राजधानी वॉर्सा येथे या करारावर 14 मे रोजी स्वाक्षरी केली. याद्वारे सदस्य देशांमधील आर्थिक, लष्करी आणि सांस्कृतिक संबंधांच्या विकासावर एक करार झाला.

1963: कुवेत संयुक्त राष्ट्रांचा 111 वा सदस्य बनला.

1973: यूएस सर्वोच्च न्यायालयाने सैन्यात महिलांना समान अधिकार दिले.

1991: दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद विरोधी नेते नेल्सन मंडेला यांची पत्नी विनी मंडेला यांना चार तरुणांचे अपहरण केल्याप्रकरणी सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.

1992: भारताने LTTE वर निर्बंध लादले.

2012: इस्रायलच्या तुरुंगात 1500 पॅलेस्टिनी कैद्यांनी उपोषण सोडण्यास सहमती दर्शवली.

2013: समलिंगी विवाहाला मान्यता देणारा ब्राझील हा 15 वा देश ठरला.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: 14th May 2022 Important Events : 14 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटनाhttps://ift.tt/KHbUnFQ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या