22nd May 2022 Important Events : 22 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

22nd May 2022 Important Events : 22 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

22nd May 2022 Important Events : मे महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 22 मे चे दिनविशेष.

जागतिक जैवविविधता दिन

सजिवांना पृथ्वीवर जगायचं असेल तर जैवविविधता टिकून राहणं खूप महत्वाचं आहे. सध्या भूतलावरील जैवविविधतेमध्ये मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होताना दिसत आहे. त्याला अनेक मनुष्यनिर्मित गोष्टी कारणीभूत आहेत. त्यामुळे या विषयावर लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या वतीने दरवर्षी 22 मे रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा करण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी लोकांनी एक भूमिका घेतली पाहिजे, कृती केली पाहिजे आणि जैवविविधतेसोबत एक प्रकारचा संबंध निर्माण केला पाहिजे हा या मागचा उद्देश आहे.

1772 : समाजसुधारक, धर्मसुधारक आणि ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजा राममोहन रॉय यांचा जन्म.

आधुनिक भारतातील अग्रगण्य धर्मसुधारक आणि ब्राह्यो समाकजाचे संस्थापक होते. आपल्या धर्मविषयक आणि ईश्वरविषयक उदार तत्त्वज्ञानाचा आणि उपासनापद्धतीचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी 20 ऑगस्ट 1828 रोजी ब्राह्म समाजाची (ब्राह्मो समाजाची) स्थापना केली. सती, बालविवाह यांसारख्या अनेक वाईट प्रथांपासून त्यांनी समाजाला मुक्ती दिली.

1783 : विद्युत चुंबकाचे शोधक विल्यम स्टर्जन यांचा जन्म.

1825 मध्ये विल्यम स्टर्जन यांनी व्यवहारात प्रत्यक्ष उपयोगी पडणारे विद्युत् चुंबक बनविण्यास सुरूवात केली. त्यासाठी मृदू लोखंडी गाभ्याभोवती बसविलेल्या संवाहक तारेच्या वेटोळ्यांतून विद्युत् प्रवाह जात असताना त्या गाभ्याला चुंबकत्व प्राप्त होते आणि प्रवाह थांबताच गाभ्यातील चुंबकत्वही नष्ट होते, या तत्त्वाचा उपयोग केला. विद्युत् चुंबकाचा उपयोग बिडाचे तुकडे, लोखंडी कतरण अशांसारखा चुंबकीय राशिमाल थेट आकर्षणाने धरून आणि यारीच्या साहाय्याने उचलण्यासाठी करता येते. या प्रकारच्या चुंबकांना उच्चालक (उत्थापक) विद्युत् चुंबक म्हणतात.

1871 : संस्कृत विद्वान, भाषांतरकार विष्णू वामन बापट यांचा जन्म.

महाराष्ट्रातील एक शांकरमतानुयायीअद्वैती. संस्कृतातील बरेचसे प्राचीन तत्त्वज्ञानसाहित्य विष्णू बापट यांनी मराठीत आणले. गीता, उपनिषदे आणि ब्रह्मसूत्र ह्या प्रस्थानत्रयीचा शांकरभाष्यानुसार परिचय त्यांनी मराठीतून घडविला. तसेच भारतीय तत्त्वज्ञानातील अद्वैतादी विविध दर्शनांवर मराठीतून लेखन केले.

1927 : चीनच्या झिनिंग जवळ झालेल्या 8.3 तीव्रतेच्या भूकंपात 2,00,000 लोक ठार झाले.

2004 : भारताचे 13 वे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी सूत्रे हाती घेतली.

सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 20 मे 2004 साली काँग्रेस पक्षांतर्गत निवड झालेल्या मनमोहन सिंग यांच्या नावाची संयुक्त पुरोगामी आघाडीचे पंतप्रधान म्हणून घोषणा केली. आणि 22 मे रोजी डॉ. मनमोहन सिंग यांनी सूत्रे हाती घेतली.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/iboxehf May 2022 Important Events : 19 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

<a href="https://ift.tt/xBmDb8n May 2022 Important Events : 21 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

<a href="https://ift.tt/rj8xdyG Days in May : मे महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: 22nd May 2022 Important Events : 22 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटनाhttps://ift.tt/0TzDqeJ

0 Response to "22nd May 2022 Important Events : 22 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel