Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website
Label
lisensi
Advertisement
Advertisement
रविवार, ८ मे, २०२२, मे ०८, २०२२ WIB
Last Updated 2022-05-08T02:48:20Z
careerLifeStyleResults
Mother's Day Google Doodle 2022 : 'मदर्स डे'च्या निमित्तानं गुगलचं खास डूडल, आईच्या प्रेमाचा संदेश
Advertisement
<a href="https://ift.tt/KmdIpWT Day Google Doodle 2022 : सर्च इंजिन गुगल (Google) विशेष दिनाच्या निमित्ताने खास गुगल डुडल (Google Doodle) बनवून शुभेच्छा देताना पाहायला मिळतं. असंच आजही गुगलने 'मदर्स डे' म्हणजेच मातृदिनाच्या खास गुगल डुडल बनवून शुभेच्छा दिल्या आहेत. जगभरातील अनेक देशांमध्ये मे महिन्याचा दुसरा रविवार हा दिवस 'मदर्स डे' म्हणून साजरा करण्यात येतो. जगभरात मदर्स डे वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. पण बहुतेक ठिकाणी मे महिन्याचा दुसरा रविवार हाच मदर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो. यावषी हा मदर्स डे 8 मे रोजी म्हणजेच आज आहे. यानिमित्ताने गुगलने खास डुडल साकारलं आहे.
गुगलने  मदर्स डेच्या निमित्ताने गुगड डुडल साकारत शुभेच्छा दिल्या आहेत. मदर्स डेच्या निमित्ताने गुगलने चार स्लाइड्ससह खास Gif  डूडल तयार केलं आहे. या डूडल स्लाइडमध्ये एक बाळाचा हात आणि एक आईचा हात दाखवण्यात आला आहे. चार स्लाईडमध्ये हे डुडल तयार करण्यात आलं आहे. एका स्लाईडमध्ये मुलाने आईचे बोट धरलेलं दाखवण्यात आलं आहे. दुसरी स्लाइड आई मुलाला ब्रेल लिपी शिकवताना दिसत आहे. तिसऱ्या स्लाईडमध्ये आई मुलाला नळाच्या पाण्याखाली हात धुवायला शिकवत आहे. तर शेवट्या चौथ्या स्लाईडमध्ये आई आणि मूल झाडं लावताना दिसत आहे.
अमेरिकेत मदर्स डेला मोठे स्वरुप राष्ट्रपती वुड्रो विल्सन यांच्या कार्यकाळात मिळाले. विल्सन यांनी 1914 साली मे महिन्यातील दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली. काही देशांमध्ये मदर्स डे वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. ब्रिटनमध्ये, मार्चच्या चौथ्या रविवारी मदर्स डे साजरा करण्याची परंपरा आहे. तर ग्रीसमध्ये 2 फेब्रुवारीला मदर्स डे साजरा केला जातो.
इतर बातम्या :
<a href="https://ift.tt/teLMkz8 Day 2022 : 'मदर्स डे' निमित्त आईबरोबर शेअर करा 'या' गोष्टी; नातं होईल अधिक घट्ट
<a href="https://ift.tt/Zqbltf8 Day 2022 : यंदाचा ‘मदर्स डे’ नायिकांसाठी असणार खास! ‘या’ अभिनेत्रींकडे झालंय चिमुकल्या पाहुण्याचं आगमन!
<a href="https://ift.tt/pZn0Q7w Day 2022 : आईविषयी प्रेम व्यक्त करणाऱ्या मातृदिनाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या...
<a href="https://ift.tt/e7v5jxG Day 2022 : 'या' अनोख्या भेटवस्तू देऊन आईला शुभेच्छा द्या! मदर्स डे होईल खास
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Mother's Day Google Doodle 2022 : 'मदर्स डे'च्या निमित्तानं गुगलचं खास डूडल, आईच्या प्रेमाचा संदेशhttps://ift.tt/sN5uP1U