Skin Care : उन्हाळ्याच्या काळात टॅनिंगची समस्या उद्भवणे सामान्य आहे. मात्र, वेळीच यावर उपाय केले नाही तर, आपल्या त्वचेला नुकसान होऊ शकते. बाजारत मिळणारे महागडे सनस्क्रीन पुन्हा पुन्हा वापरणे प्रत्येकाला शक्य नसते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे टॅनिंगच्या समस्येपासून सहज सुटका मिळू शकते.

आपल्याकडे स्वयंपाकात, भाजीमध्ये बटाट्याचा वापर जास्त केला जातो. स्वयंपाकघरातही ते सहज उपलब्ध असतात. तुम्हाला माहीत आहे का बटाट्यामुळे चेहऱ्याच्या टॅनिंगची समस्या दूर होऊ शकते. चला तर जाणून घेऊया...

बटाट्यात असतात ‘हे’ गुण

बटाटे त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहेत. यामध्ये लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-डी असे गुणधर्म असतात. डोळ्यांना थंडावा देण्यासाठी कच्चे बटाटे कापून डोळ्यांवर ठेवण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. तर, त्वचेसाठी देखील कच्चा बटाटा योग्य पद्धतीने वापरला, तर फायदेशीर ठरतो.

कच्च्या बटाट्याचा पॅक

चेहऱ्यावर किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर खूप टॅनिंग झाले असेल, तर तुम्ही तिथे बटाट्याचा पॅक लावा. यासाठी कच्चा बटाटा, गुलाबजल आणि मुलतानी माती एकत्र मिसळा. हा पॅक बनवण्यासाठी प्रथम कच्चे बटाटे किसून घ्या. त्यात आवश्यकतेनुसार मुलतानी माती आणि गुलाबपाणी मिसळून लावा. हा पॅक 15 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या, नंतर चेहरा धुवा. असे नियमित केल्याने तुमच्या त्वचेवरील टॅनिंग देखील निघून जाईल आणि तुमची त्वचा देखील चमकू लागेल.

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठीही उपयोगी!

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी बटाटा आणि हळदीचा फेस पॅक लाभदायी ठरतो. यासाठी अर्धा बटाटा किसून, त्यात चिमूटभर हळद घाला. हा पॅक मानेपासून चेहऱ्यापर्यंत लावा. अर्धा तास तसाच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. या पॅकच्या रोजच्या वापराने चेहऱ्याचा रंगही उजळ होतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

अति उष्णतेमुळे डोळे होऊ शकतात खराब, अशी घ्या डोळ्यांची काळजी

<a href="https://ift.tt/YGFoAyD Growth : केस लांब आणि चमकदार बनवायचे आहेत? करा 'हा' घरगुती उपाय

<a href="https://ift.tt/Dwr0i9X Care : चहासोबत चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी; होऊ शकतात गंभीर आजार

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Skin Care : टॅनिंगची समस्या दूर करायचीय? कच्चा बटाटा ठरेल लाभदायी! ‘अशा’प्रकारे करा वापर...https://ift.tt/U0ct2j9
0 टिप्पण्या