<a href="https://ift.tt/evPgtAE Skin Care Tips : उन्हाळ्यात टॅनिंगची समस्या प्रत्येकालाच जाणवते. उन्हात फिरणाऱ्या व्यक्तींनाच नाही तर सावलीत असणाऱ्या लोकांनाही टॅनिंगची समस्या उद्बवते. वाढलेल्या तापमानामुळे सावलीत असल्यावरही टॅनिंग होते. याच कारण म्हणजे गरम हवा आणि तापमान आहे. टॅनिंग झाल्यानंतर तुम्ही घरीच स्क्रब बनवून तुमची त्वचा सुंदर, मुलायम आणि चमकदार बनवू शकता. हे स्क्रब वापरून तुम्ही त्वेचवरील टॅनिंग काळपटपणा दूर करू शकता. तसेच या स्क्रबमुळे तुमच्या त्वचेवरील मृत त्वचाही निघून जाईल. यामुळे तुमची त्वचा सुंदर, तजेलदार आणि मुलायम बनेल.

बेसणाचं स्क्रब
बेसणामध्ये मोहरीचं किंवा बदाम तेल, गुलाब पाणी आणि चंदन पावडर मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट त्वचेवर स्क्रबप्रमाणे वापरा. त्यानंतर 15 मिनिटांसाठी तशीच राहू द्या. या नंतर तुन्हा स्क्रब स्वच्छ पाण्याने धुवा. या स्क्रबमुळे त्वचेवर टॅनिंग दूर होईल.

कॉफी स्क्रब
एका वाटीमध्ये कॉफी पावडर आणि नारळाचं तेल मिसळून स्क्रब तयार करा. आता हे त्वचेवर स्क्रब टॅनिंग झालेल्या ठिकाणी लावा. स्क्रब केल्यानंतर 10 मिनिटे त्वचेवर तसंच राहू दे. त्यानंतर स्क्रब थंड पाण्याने धुवा. हे स्क्रब तुमच्या त्वचेवरील मृत त्वचा आणि टॅनिंग दूर करण्यास मदत करेल.

बडीशेपचं स्क्रब
बडीशेप घेऊन ती मिक्सरमध्ये वाटून घ्या. हे मिश्रण एका बरणीत भरून ठेवा. एक चम्मच वाटलेली बडीशेप घ्या. यामध्ये एक चमचा मुलतानी माती आणि गुलाब पाणी मिसळा. याची पेस्ट तयार करुन घ्या. हे स्क्रब चेहऱ्यावर किंवा टॅनिंग झालेल्या त्वचेवर लावा. 15 मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुवा. या स्क्रबने तुमच्या त्वचेवरील टॅनिंग दूर होईल. तुमची त्वचा सुंदर, चमकदार आणि मुलायम होईल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/n2YyA1s Tips : जेवल्यानंतर लगेच करु नका 'ही' चूक, आरोग्यावर होईल वाईट परिणाम

<a href="https://ift.tt/r9thGp3 Tips : टरबूजाच्या बियांमध्ये आहेत अनेक गुणधर्म, जाणून घ्या याचे फायदे

<a href="https://ift.tt/p1iT87J Care: प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' आहे आवश्यक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Summer Skin Care : त्वचा सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी घरीच बनवा 'हे' स्क्रबhttps://ift.tt/k7GNTiV
0 टिप्पण्या