TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Weight Loss Tips : काय म्हणता? पोहे खाल्ल्याने वजन कमी होऊ शकतं!

Weight Loss Tips : सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो, असं अनेकदा आपण ऐकलं आहे. एवढच नाहीतर अनेक संशोधानांमधूनही ही बाब सिद्ध झाली आहे. सध्याच्या धावपळीच्या जगात प्रत्येकजण स्वतःला हेल्दी अन् फिट ठेवण्यासाठी धडपडत असतो. अशातच फिट राहण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नाश्ताही हेल्दी असावा, असं प्रत्येकाला वाटत असतं. अनेकजण वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्या डाएटमध्ये हेल्दी पदार्थांचा समावेश करतात. त्यामुळे वजन कमी करण्यासोबतच आरोग्यही उत्तम राखण्यास मदत होते.

भारतात नाश्त्यासाठी सर्वात लोकप्रिय पदार्थ म्हणजे, पोहे. पण तुम्हाला माहीत आहे का? नाश्त्यासाठी आवडीने खाल्ला जाणारा हा पदार्थ, वजन कमी करण्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतो.  पोहे पचण्यास हलके असतात. तसेच, पोह्यांमुळे सतत भूक लागण्याची समस्या उद्भवत नाही आणि पोटही बराच वेळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त खाण्यापासून बचाव होतो. पोहे रक्तप्रवाहात ग्लूकोज संथ गतीने रिलीज करतं. ज्यामुळे बराच वेळ भूक लागत नाही. एक वाटी पोह्यांमध्ये जवळपास 206 कॅलरी असतात. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या विचारात असाल तर पोहे तयार करताना त्यामध्ये शेंगदाणे आणि बटाट्याऐवजी कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि इतर भाज्यांचा वापर करा.

पोह्यांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. नाश्त्यासाठी पोहे खाणं हा उत्तम आणि पौष्टिक पर्याय आहे. यामध्ये 75 टक्के कार्बोहायड्रेट, 23 टक्के फॅट्स आणि जवळपास 8 टक्के प्रोटीन असतं. तसेच पोह्यांमध्ये आयर्न, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी सहित अनेक महत्त्वपूर्ण खनिज मुबलक प्रमाणात असतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/mv3VXFo Care : चहासोबत चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी; होऊ शकतात गंभीर आजार

<a href="https://ift.tt/EW8owXK Tips :वजन वाढेल, दातही खराब होतील! कोल्ड्रिंक्सच्या सेवनाने पोहोचेल आरोग्याला हानी, जाणून घ्या..

<a href="https://ift.tt/RuLpyT4 Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Weight Loss Tips : काय म्हणता? पोहे खाल्ल्याने वजन कमी होऊ शकतं! https://ift.tt/v1Nt7Tm

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या