California Research News : मानवी शरीरात अशी अनेक रहस्ये दडलेली आहेत, ज्याचा उलगडा वैज्ञानिक वेळोवेळी करत असतात. असाच काहीसा प्रकार अमेरिकेत एका संशोधनातून समोर आला आहे, त्यानुसार आपल्या पोटात आढळणारे बॅक्टेरिया देखील वीज निर्माण करू शकतात. धक्कादायक आहे, पण सत्य आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील एका संशोधनात असे आढळून आले आहे की, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लिस्टरियोसिस होण्यास कारणीभूत असलेले बॅक्टेरिया वीज निर्माण करू शकतात.

'लिस्टेरिया' नावाच्या जीवाणूंद्वारे वीज तयार होते.

लिस्टेरिया नावाचा हा जीवाणू पोटातील अन्न प्रदूषित करून रोग पसरवतो. संशोधनात, शास्त्रज्ञांना आपल्या पोटात अशा प्रकारच्या जीवाणूंच्या अनेक प्रजाती सापडल्या आहेत, ज्यातून वीज निर्माण होते. एका फ्लास्कमध्ये या जीवाणूंच्या दरम्यान इलेक्ट्रोड्स ठेवून, मोठ्या प्रमाणात वीज तयार केली जात होती. शास्त्रज्ञ आता कचरा प्रक्रिया प्रकल्प किंवा लहान इलेक्ट्रॉनिक उपकरणे चालवण्यासाठी त्याचा वापर करण्याचा मार्ग शोधत आहेत.

असे संशोधन प्रथमच झाले!
संशोधनात सहभागी असलेले प्रोफेसर डॅन पोर्टनॉय म्हणाले होते की, शरीरात असलेल्या रोगजनक (जंतू), प्रोबायोटिक बॅक्टेरिया आणि जंतूंबाबत असा शोध यापूर्वी झालेला नाही. हे संशोधन एका प्रतिष्ठित जर्नल 'नेचर'मध्ये प्रकाशित झाले आहे.

इलेक्ट्रोजेनिक बॅक्टेरियामध्ये हे गुणधर्म असतात

वीज निर्माण करणाऱ्या जीवाणूंना इलेक्ट्रोजेनिक म्हणतात. असे जीवाणू फक्त आम्लयुक्त खाणींमध्ये किंवा तलावामध्ये आढळतात असे मानले जात होते. शास्त्रज्ञांचा दावा आहे की, हे जीवाणू सुमारे 500 मायक्रोअँपिअर वीज तयार करतात. या जीवाणूंमध्ये फ्लेविन नावाचा घटक आढळतो, जो विजेच्या लहरी स्वीकारतो. हे व्हिटॅमिन बी-12 पासून बनलेले असतात.

अशाप्रकारे वीज निर्माण होते
वीज निर्माण करण्याची प्रक्रिया जीवाणूंच्या चयापचय प्रक्रियेचा भाग आहे. मानवी पेशी ऑक्सिजनचा वापर ग्लुकोज आणि इतर प्रकारच्या ऊर्जेसाठी करतात. परंतु या एककोशिकीय (एक-कवच असलेल्या) सूक्ष्मजीवांना हा पर्याय नाही. खाणींमध्ये आढळणारे इलेक्ट्रोजेनिक बॅक्टेरिया ऑक्सिजन म्हणून लोह किंवा इतर धातू वापरतात. सेलच्या बाहेरून आतपर्यंतच्या प्रक्रियेदरम्यान वीज वाहून नेणारे इलेक्ट्रॉन तयार होतात.

इतर बातम्या>

NASA : चंद्रावरुन आणलेल्या मातीत लावलं रोप, पुढे 'जे' घडलं ते पाहून नासाचे शास्त्रज्ञही आश्चर्यचकित!

NASA : मंगळ ग्रहावर दिसला एलियनच्या घराचा दरवाजा? नासाच्या नव्या फोटोंचं गूढ काय?

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Weird Fact Of The Day : मानवी पोटात असे बॅक्टेरिया सापडले आहेत, जे वीज निर्माण करतात? संशोधनातून बाब समोरhttps://ift.tt/jOeUL0n
0 टिप्पण्या