Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २० जून, २०२२, जून २०, २०२२ WIB
Last Updated 2022-06-20T03:48:28Z
careerLifeStyleResults

Health Tips : पुरेशी आणि वेळेवर झोप आपल्यासाठी अत्यंत महत्वाची; झोप येत नसेल तर हे उपाय करा...

Advertisement

Health Tips : झोपणं हे मानवी शरीरासाठी अत्यंत महत्वाचं आहे. त्यातही वेळेवर झोपण्याने तुमच्या व्यक्तीमत्त्वात फरक पडतो, असा दावा करण्यात आला आहे. एका जनरलमध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्चनुसार, जर एखाद्या व्यक्तीची दोन रात्र पूर्ण झोप झाली नसेल, तर त्याच्या व्यक्तीमत्त्वावर त्याचा परिणाम होतो. स्टॉकहोम विद्यापीठाच्या संशोधकांनी याबाबतचं संशोधन केलं आहे. या संशोधनसाठी डॉक्टरांनी 25 जणांचं अध्ययन केलं. यातील एका समुहाला दोन रात्र मनसोक्त झोपण्यास सांगितलं होतं. तर दुसऱ्या समुहाला दोन रात्रींसाठी केवळ चार-चार तास झोप घेण्यास सांगितलं होतं. या अध्ययनावेळी दोन्ही समुहातील व्यक्तींचे मेकअपशिवाय फोटो काढण्यात आले. त्यांचे हे फोटो 122 अज्ञात लोकांना दाखवून यामधील अॅक्टिव्ह, हेल्दी, उत्साही, आणि विश्वसनीय कोण वाटतो, असं विचारलं. यावेळी अनेकांनी वेगवेगळी उत्तरं दिली.

पण यातील बहुतांश जणांनी ज्या लोकांची चार-चार तासच झोप झाली होती, त्यांच्याविषयी नकारात्मक प्रतिक्रिया दिली. तर ज्यांची झोप पूर्ण झाली होती, ते सर्वाधिक उत्साही आणि त्यांच्या चेहऱ्यावरही प्रसन्नता होती. यावरुन ज्यांची झोप वेळेवर होते, त्यांचं आरोग्यही चांगलं असतं, तसेच ते सदैव उत्साही असतात, असा दावा संशोधकांनी केला आहे. तसेच यामुळे लोक तुमच्या व्यक्तीमत्त्वाप्रती सकारात्मक असतात असंही संशोधकांनी सांगितलं. त्यामुळे तुमच्या व्यक्तीमत्त्वात सकारात्मक बदल घडवण्यासाठी रोज आठ तास झोप पूर्ण करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

झोप येण्यासाठी काय करावं

रात्री झोपण्यापूर्वी पुस्तक वाचावं
झोपण्यापूर्वी मद्यपान करु नये, यामुळेही झोप येत नाही.
गाणी ऐकण्याची आवड असेल, तर गाणी ऐकावी, गाणी ऐकल्यानेही लवकर झोप लागते.
100, 99  अशी उलटी उजळणी म्हणावी, यामुळे एकाग्रता मिळण्यास मदत होते, जेणेकरुन झोप लवकर लागते.
झोप येत नसेल, तर आपल्या श्वास घेण्याच्या प्रक्रियेकडे लक्ष केंद्रित करावं.
झोपण्यापूर्वी अंघोळ करणं हा देखील चांगला उपाय आहे. यामुळे अजून चांगली झोप लागते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : पुरेशी आणि वेळेवर झोप आपल्यासाठी अत्यंत महत्वाची; झोप येत नसेल तर हे उपाय करा...https://ift.tt/1WeIksR