HSC result 2022: धकधक होरेला? अजिबात घाबरायचं नाही, छातीवर हात ठेवायचा आणि म्हणायचं,”ऑल इज वेल,ऑल इज वेल!” Rojgar News

HSC result 2022: धकधक होरेला? अजिबात घाबरायचं नाही, छातीवर हात ठेवायचा आणि म्हणायचं,”ऑल इज वेल,ऑल इज वेल!” Rojgar News

"ऑल इज वेल,ऑल इज वेल!"

मुंबई: आज मजल दरमजल करत आपण बारावीच्या निकालापर्यंत (HSC Results 2022) पोहचलोय. आजचा दिवस तुमच्यासाठी अवघड आणि महत्त्वाचा आहे. दोन वर्ष आपण सगळेच कोरोना महामारीत होतो. पेपर लिहायची सवय सुटली होती. अभ्यास करायची सवय राहिली नव्हती. कधी ऑनलाईन कॉलेज, कधी ऑनलाईन परीक्षा असं करत करत अखेर परीक्षा झाली आणि आज निकालाची वेळ आली. आज दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल लागणार आहे. यावेळचा बारावीचा निकाल जरा खास आहे. पालकांसह विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. घाबरायचं कारण नाही अपयश (Failure) जरी मिळालं तरी शासनाने पुन्हा एक संधी देऊ केलीये. शिवाय तुम्ही एकटे आहेत का? जवळपास 15 लाख विद्यार्थी या प्रोसेसमध्ये तुमच्या सोबत आहेत. काल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी एक ट्विट केलंय ज्यात त्यांनी सांगितलंय कि हा निकाल शिक्षण मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. 8 जून,2022 रोजी दु.1:00 वा. ऑनलाईन जाहीर होईल.

शिक्षणमंत्र्यांचं ट्विट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ.12 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. 8 जून,2022 रोजी दु.1:00 वा. ऑनलाईन जाहीर होईल – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

वाऱ्यापेक्षा वेगात निकाल तुमच्या दारी! फक्त TV9 मराठीवर

बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे/ झालाय सर्व विद्यार्थी आणि पालकांना अतिशय वेगवान पद्धतीनं आणि अचूक निकाल मिळवायचा असेल तर आम्ही तुमची मदत करू शकतो. तुम्ही हा निकाल टीव्ही9 मराठीच्या वेबसाईटवर बघू शकता. रोल नंबर, आईचं नाव आणि संबंधित माहितीच्या आधारे तुम्हाला हा निकाल आपल्या टीव्ही9 मराठीच्या वेबसाईटवर लाईव्ह बघता येणार आहे. एकदम सोप्पंय! काहीच करायचं नाही फक्त एक क्लिक करायचं. इथे क्लिक करा. बारावीचा निकाल पाहण्यासाठी या https://ift.tt/MJp5yNS लिंकवर क्लिक करा.

लाईव्ह ब्लॉग

मित्रांनो बारावीच्या निकालाच्या लाईव्ह अपडेट्ससाठी, महत्त्वाच्या घडामोडी, सर्व अपडेट्स, निकालाच्या ब्रेकिंग या सगळ्या माहितीसाठी टीव्ही9 मराठीच्या लाईव्ह ब्लॉग भेट द्या. तुम्हाला फटाफट अपडेट्स इथे मिळतील. इथे क्लिक करा – LIVE BLOG TV9 मराठी


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: HSC result 2022: धकधक होरेला? अजिबात घाबरायचं नाही, छातीवर हात ठेवायचा आणि म्हणायचं,”ऑल इज वेल,ऑल इज वेल!”https://ift.tt/L9dJmSq

0 Response to "HSC result 2022: धकधक होरेला? अजिबात घाबरायचं नाही, छातीवर हात ठेवायचा आणि म्हणायचं,”ऑल इज वेल,ऑल इज वेल!” Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel