Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २२ जून, २०२२, जून २२, २०२२ WIB
Last Updated 2022-06-22T02:43:23Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

JEE Main 2022: उद्यापासून JEE Main सुरू! सिटी इन्टिमेशन स्लिप आणि ॲडमिट कार्ड डाऊनलोड करा Rojgar News

Advertisement
सिटी इन्टिमेशन स्लिप आणि ॲडमिट कार्ड डाऊनलोड करा

नवी दिल्ली : जेईई मेन (JEE Main 2022 Exam) जून सत्रासाठी 2022 साठीचे प्रवेशपत्र (Admit Card) जाहीर करण्यात आलंय. 20 ते 23 जून दरम्यान घेण्यात येणारी ही परीक्षा पुढे ढकलून 23 जून पासून घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. विद्यार्थी आपलं प्रवेशपत्र https://jeemain.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवरून डाऊनलोड करू शकतात. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency)  सिटी इन्टिमेशन स्लिप जारी केलीये. विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर जाऊन सिटी इन्टिमेशन स्लिप डाऊनलोड करू शकतात. इन्टिमेशन स्लिपमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा शहरांची माहिती मिळू शकते. एनटीएने परीक्षांची तारीख सुद्धा बदलली आहे.

परीक्षा उद्यापासून म्हणजेच 23 जून 2022 पासून

एनटीएने परीक्षेची तारीख 20 जून ते 23 जून 2022 पर्यंत वाढवली होती. एनटीएने जारी केलेल्या पत्रकानुसार जेईई मेन 2022 ची प्रवेश परीक्षा आता उद्यापासून म्हणजेच 23 जून 2022 पासून घेण्यात येणार आहे. जेईई मेन २०२२ च्या पहिल्या सत्राच्या परीक्षा 23,24,25,26,27, 28 आणि 29 जून रोजी होणार आहेत. यापूर्वी ही परीक्षा 20 ते 29 जून 2022 या कालावधीत होणार होती. एनटीएतर्फे जेईई मेन 2022 सत्र 1 विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. देशभरातील 501 शहरे आणि भारताबाहेरील 22 शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

असे डाऊनलोड करा ॲडमिट कार्ड

  • ॲडमिट कार्ड (जेईई मेन 2022 हॉल तिकीट) डाऊनलोड करण्यासाठी jeemain.nta.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होमपेजवर देण्यात आलेल्या ॲडमिट कार्डच्या (JEE Main Admit Card) लिंकवर क्लिक करा.
  • आता तुम्हाला तुमची ओळखपत्रे प्रविष्ट करावी लागतील, जसे की अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख.
  • ॲडमिट कार्ड (JEE mains admit card phase 1) स्क्रीनवर दिसेल.
  • ॲडमिट कार्डमध्ये परीक्षेची तारीख आणि वेळ तपासा.
  • डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.

 


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: JEE Main 2022: उद्यापासून JEE Main सुरू! सिटी इन्टिमेशन स्लिप आणि ॲडमिट कार्ड डाऊनलोड कराhttps://ift.tt/lSH5rTy