Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ८ जून, २०२२, जून ०८, २०२२ WIB
Last Updated 2022-06-08T02:43:28Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

Maharashtra HSC Result 2022 Live : बारावीच्या विद्यार्थ्यांनो इथे लक्ष द्या! निकालानंतर ‘या’ तारखा तुमच्यासाठी महत्त्वाच्यात Rojgar News

Advertisement
HSC_WEB_THUMB 02

मुंबई : बारावीचा ऑनलाईन निकाल (Maharashtra HSC Result 2022 Live) आज जाहीर होईल. ऑनलाईन पद्धतीनं निकाल जाहीर झाल्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत, ते ही स्पष्ट करण्यात आलंय. विद्यार्थ्यांना (HSC Result 2022) गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत शिवाय पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय शिक्षण मंडळाकडे अर्ज करता येणार आहे. हे अर्जही ऑनलाईन पद्धतीने करता येऊ शकणार आहेत. 10 जूनपासून हे अर्ज बारावीच्या विद्यार्थ्यांना करता येऊ शकतील. त्यासाठी http:verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटवरुन ऑनलाईन अर्ज (Online Result) विद्यार्थ्यांना करता येऊ शकेल. बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर होईल. सर्व विद्यार्थी आणि पालकांना वेगावान आणि निकालाची अचूक माहिती टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर पाहायला मिळू शकेल. रोल नंबर, आईचं नाव आणि संबंधित माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांना आपला निकाल टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर लाईव्ह पाहता येईल. त्यासाठी इथे क्लिक करा.

महत्त्वाच्या तारखा

ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला मिळालेल्या गुणांबाबत शंका असेल, ते पुन्हा पेपर रिचेकींगसाठी अर्ज करु शकतात. गुणपडताळणीसाठी 10 ते 20 जून, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 10 ते 29 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्यासोबत या अर्जासाठीचं शुल्कही ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांना भरता येऊ शकेल.

  1. पेपर रिचेकींगसाठी 10 जूनपासून ते 20 जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत
  2. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 10 ते 29 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत
  3. अर्ज करण्यासाठीचं शुल्कही ऑनलाईन भरता येणार
  4. नापास विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाणार
  5. पुरवणी परीक्षेसाठी 10 जूनपासूनच अर्जाची प्रक्रिया सुरु होणार
  6. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना http:verification.mh-hsc.ac.in या लिंकवर जावं लागेल.

आधी छायाप्रत घेणं महत्त्वाचं

उत्तर पत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणं आवश्यक असतं. छायापत्र मिळाल्यापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत मुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थी अर्ज करु शकतात.

एकूण किती विद्यार्थी बारावी परीक्षेला बसलेत?

  1. एकूण विद्यार्थी 14 लाख 85 हजार 191
  2. मुलं – 8 लाख 17 हजार 188
  3. मुली – 6 लाख 68 हजार 003

दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत यश येणार नाही, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा परीक्षेला बसण्याची संधी देण्यात येणार आहे. अशा विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा घेतली जाईल. परुवणी परीक्षेसाठीदेखील 10 जूनपासून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरुन घेतले जाणार आहेत.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Maharashtra HSC Result 2022 Live : बारावीच्या विद्यार्थ्यांनो इथे लक्ष द्या! निकालानंतर ‘या’ तारखा तुमच्यासाठी महत्त्वाच्यातhttps://ift.tt/L9dJmSq