TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Mumbai University: मुंबई विद्यापीठाकडून पहिली गुणवत्ता यादी जाहीर,कॉमर्स शाखेला विद्यार्थ्यांची पसंती! एफवायच्या कटऑफमध्ये मोठी घट Rojgar News

मुंबई विद्यापीठाकडून पहिली गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई: मुंबई विद्यापीठानं (Mumbai University) काल, बुधवारी पदवी प्रवेशाची (FY Entrance) पहिली गुणवत्ता यादी जाहीर केलीये. केंद्रीय मंडळांच्या बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच मुंबई विद्यापीठाने ही यादी जाहीर केलीये. गेल्या वर्षी वाढलेला कटऑफ यंदा खाली आला आहे. सायन्स शाखेच्या कटऑफमध्ये मोठी घट यंदा झाली असून त्याखालोखाल कॉमर्स आणि आर्ट्सचा कटऑफही (Cut-Off) खाली आला आहे. कॉमर्स शाखेतील व्यावसायिक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती आहे. आर्ट्स आणि सायन्सला तितकीशी विद्यार्थ्यांची पसंती नाही. गेल्या वर्षी कोरोनामुळे अंतर्गत मूल्यमापनाआधारे बारावीचा निकाल लागल्याने त्याचा परिणाम एफवायच्या कटऑफवर झाल्याचं दिसून येतंय. कटऑफमध्ये यंदा 2 ते 10 टक्क्यांपर्यंत मोठी घट झालीये.

महत्त्वाच्या तारखा

  1. पहिल्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी आणि ऑनलाइन फी भरणा 30 जून ते 6 जूलै दुपारी 3 वाजेपर्यंत होणार आहे.
  2. दुसरी गुणवत्ता यादी 7 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे.

काय म्हणतोय यंदाचा कटऑफ?

  1. डहाणूकर कॉलेजच्या बीकॉमच्या कटऑफमध्ये यंदा तब्बल ८ टक्क्यांची घट पहायला मिळाली.
  2. रूपारेल कॉलेजचा गेल्या वर्षी बीएचा कटऑफ ९३.१६ टक्क्यांवर होता. यंदा त्यात ७ टक्क्यांची घट पहायला मिळालीये.

कॉलेज आणि कटऑफ

रुईया कॉलेज

  • बीए 89.33
  • बीएसस्सी 74
  • बीएसस्सी कॉम्प्युटर सायन्स 87.5
  • बायोकेमिस्ट्री 72.17
  • बायोटेक्नॉलॉजी 92

रूपारेल कॉलेज

  • बीए 86.83
  • बीकॉम 76.16
  • बीएसस्सी (कॉम्प्युटर सायन्स) (गणित 73 गुण),
  • बीएमएस (कॉमर्स 84, आर्ट्स 71.16, सायन्स 62.33)

पोदार कॉलेज

  • बीकॉम 92.33
  • बीएमएस- (कॉमर्स 93.5, आर्ट्स 82.33, सायन्स 89)

साठये कॉलेज

  • बीए 38.16
  • बीएसस्सी 40.83
  • बीकॉम 67.16
  • बीएसस्सी आयटी 77
  • बीएएफ 81.16
  • बीएफएम43.83
  • बीएमएमसी (कॉमर्स 75.50, सायन्स 51.16, आर्ट्स 68.66)
  • बीएमएस (कॉमर्स 81.83, सायन्स 62.33, आर्ट्स 53)

झेवियर्स कॉलेज

  • बीए 92
  • बीएसस्सी (बायोलॉजिकल) 82.33
  • (नॉन- बायोलॉजिकल) 82.17

विल्सन कॉलेज

  • बीएमएस ( आर्ट्स 78.67, कॉमर्स 88, सायन्स 88)
  • बीएएमएमसी (आर्ट्स 85.67 कॉमर्स 85, सायन्स 83.17)
  • बीएएफ 88.5
  • बीकॉम 85.5
  • बीएसस्सी आयटी 86

हिंदुजा कॉलेज

  • बीएएफ 84.83,
  • बीएफएम – 83.50,
  • बीएसस्सी आयटी (67गणित गुण),
  • बीएमएस (कॉमर्स 85, आर्ट्स 73.17, सायन्स 76.17)
  • बीएएमएमसी (कॉमर्स 75.33, आर्ट्स 68, सायन्स 80.50)
  • बीकॉम 65.50
  • बीबीआय – 63.67

डहाणूकर कॉलेज

  • बीकॉम 78.50
  • बीएएफ 81.33
  • बीबीआय 72.5
  • बीएफएम 74.5
  • बीएमएस (कॉमर्स 85.33, सायन्स 70, आर्ट्स 64.66),
  • बीएएमएमसी ( आर्ट्स 60.5, कॉमर्स 65.16, सायन्स 44.33)

मुलुंड कॉलेज

  • बीकॉम 88.50
  • बीएएफ 88.50
  • बीबीआय 78
  • बीएफएम 82.50
  • बीएसस्सी कॉम्प्युटर सायन्स 64
  • बीएमएस (कॉमर्स 86.80, सायन्स 70.33,आर्टस् 68)

झुनझुनवाला कॉलेज

  • बीएस्सी 52
  • बीकॉम 85
  • बीए 50
  • बीबीआय65
  • बीएस्सी बीटी 75
  • बीएएमएमसी 60
  • बीएएफ 80.83
  • बीएसस्सी कॉम्प्युटर सायन्स 71
  • आयटी 76.67
  • बीएमएस (कॉमर्स 76.33, सायन्स 67.50, आर्ट्स 60.33 )

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Mumbai University: मुंबई विद्यापीठाकडून पहिली गुणवत्ता यादी जाहीर,कॉमर्स शाखेला विद्यार्थ्यांची पसंती! एफवायच्या कटऑफमध्ये मोठी घटhttps://ift.tt/4mbTAIz

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या