TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

CBSE 10th Results 2022: सीबीएसई दहावीचा निकाल आज लागण्याची शक्यता! असा चेक करायचा निकाल Rojgar News

CBSE 10th Results 2022

CBSE 10th Results 2022: सीबीएसईच्या बोर्ड परीक्षेच्या (CBSE Board Exam) विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलीये. आज दहावीचा ४ जुलैला दहावीचा निकाल लागणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे कुठल्याही क्षणी दहावीचा निकाल सीबीएसई बोर्डाकडून जाहीर केला जाऊ शकतो. शिक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाकडून सीबीएसई (CBSE Board) दहावीचा निकाल 4 जुलैच्या आसपास आणि बारावीचा निकाल 10 जुलै 2022च्या (CBSE 10th Results 2022) आसपास जाहीर होण्याची शक्यता होती. सीबीएसईचे अधिकारी आज कधीही दहावी निकाल 2022 च्या रिलीजची तारीख आणि वेळ जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. यावर्षी टर्म 1 आणि टर्म 2 सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर cbse.gov.in किंवा cbresults.nic.in जाहीर केला जाईल. बोर्ड प्रथम दहावीचा निकाल जाहीर करेल यानंतर 12 वीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीएसई 4 जुलै 2022 रोजी दहावीचा 2 किंवा अंतिम निकाल जारी करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बारावीचा निकाल 10 जुलै किंवा त्यानंतर जाहीर होऊ शकतो. मात्र सीबीएसईकडून दहावी किंवा बारावीच्या निकालाच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. बोर्डाने निकालाच्या तारखेचा आधीचा पॅटर्न पाहिला तर सीबीएसई निकाल जाहीर होण्याच्या दोन-तीन तास आधी निकालाची तारीख आणि वेळ जाहीर करते.

तुम्ही या वेबसाइट्सवर पाहू शकता निकाल

कसा पाहणार निकाल

  • विद्यार्थ्यांनी प्रथम सीबीएसई www.cbse.gov.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • यानंतर होम पेजवर दिलेल्या “सीबीएसई दहावी बारावी निकाल 2022” या लिंकवर क्लिक करा.
  • आता आपला रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • तुम्ही तुमचा निकाल डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून ती तुमच्याकडे ठेवा.

विद्यार्थ्यांनी आताच तयार होऊन आपले प्रवेशपत्र काढून आपल्याकडे ठेवावे. कारण निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रावर रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक तपशील आवश्यक असतील.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: CBSE 10th Results 2022: सीबीएसई दहावीचा निकाल आज लागण्याची शक्यता! असा चेक करायचा निकालhttps://ift.tt/ISU8czB

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या