Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ३० जुलै, २०२२, जुलै ३०, २०२२ WIB
Last Updated 2022-07-30T04:43:35Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

ITI Admissions: आयटीआय प्रवेशास विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद! पहिली यादी जाहीर, 92 हजार 140 विद्यार्थ्यांची निवड Rojgar News

Advertisement
ITI Admissions

मुंबई : राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या (Industrial Training Institute) प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी (Entrance Process ITI) काल शुक्रवारी जाहीर करण्यात आली असून पहिल्या यादीत तब्बल 92 हजार 140 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना आता 3 ऑगस्टपर्यंत प्रवेश (3 August Last Date Of ITI Admissions) घ्यावे लागणार आहेत. पहिल्या प्रवेशफेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत विद्यार्थ्यांनी 30 जुलैपासून 3 ऑगस्ट, सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशा सूचना संचालनालयाने केल्या आहेत.

राज्यभरात यंदा…

  1. आयटीआयमध्ये 1 लाख 49 हजार 292 जागा
  2. त्यापैकी शासकीय आयटीआयमध्ये 93 हजार 676
  3. खासगी आयटीआयमध्ये 55 हजार 616 जागा
  4. या जागांवर प्रवेशासाठी यंदा 3 लाख 8 हजार 439 इतक्या विद्यार्थ्यांची नोंदणी
  5. त्यापैकी 2 लाख 48 हजार 796 विद्यार्थ्यांनी ट्रेड ऑप्शन भरले
  6. पहिल्या यादीत 92 हजार 206 विद्यार्थ्यांना प्रवेश, यामध्ये 75 हजार 799 शासकीय जागांवर तर 16 हजार 341 खासगी आयटीआयच्या जागांवर प्रवेश निश्चित

व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिध्द

प्रथम प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना निवड पत्र त्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे. प्रथम प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे. पसंतीक्रमांच्या प्रथम विकल्पानुसार जागा मिळाल्यास त्या विद्यार्थ्यांला प्रवेश निश्चित करावा लागेल. अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरीही त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पुढील प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही.

राज्यातील विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला

आयटीआय प्रवेशासाठी राज्यातील विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पहिल्या यादीत विद्यार्थ्यांना प्रवेश मोठ्या संख्येने मिळाले आहेत. दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावेत असं व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी म्हटले आहेत.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: ITI Admissions: आयटीआय प्रवेशास विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद! पहिली यादी जाहीर, 92 हजार 140 विद्यार्थ्यांची निवडhttps://ift.tt/DHInXE6