Deoxa Indonesian Channels

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १२ जुलै, २०२२, जुलै १२, २०२२ WIB
Last Updated 2022-07-12T02:43:12Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

JEE Main 2022 Result: नागपूरचा अदय क्रिष्णा जेईई मेनमध्ये राज्यात अव्वल! देशातील एकूण 14 जणांना 100 टक्के गुण Rojgar News

Advertisement
Adway Krishna JEE main topper nagpur

देशातील प्रमुख अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येणाऱ्या JEE Mains सत्र 1 परीक्षेचा निकाल काल 11 जुलै 2022 रोजी जाहीर झाला. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर केला. निकालासोबतच एनटीएने टॉपर्सची (JEE Main 2022 Toppers) यादीही जाहीर केली आहे. यावर्षी 14 विद्यार्थ्यांनी जेईई मेन सेशन 1 च्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवले आहेत. जेईई मेन सेशन-1 परीक्षेत 100 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये तेलंगणातील 4, आंध्र प्रदेशातील 3 विद्यार्थी आहेत. त्याच वेळी, हरियाणा, झारखंड, पंजाब, आसाम, राजस्थान, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमधून 1-1 उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात एकच मुलगी आहे, आसामच्या गुवाहाटी शहरातील स्नेहा पारीकच्या नावाचा यात समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी 300 पैकी 300 गुण मिळवले आहेत. जेईई मेन मध्ये महाराष्ट्रात प्रथम आलेला मुलगा नागपूरचा आहे. नागपुरातील अद्वय क्रिष्णा (Adway Krishna JEE Main Topper) या विद्यार्थ्याला 99.9984486 पर्सेटाईल मिळाले असून महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान त्याने पटकावला आहे.

JEE मुख्य सत्र 2,30 जुलै रोजी संपत आहे आणि निकाल देखील ऑगस्टच्या 7 दिवसात अपेक्षित आहे. आज निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्येक राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या विद्यार्थ्यांची यादी तसेच 100 टक्के विद्यार्थ्यांची यादी एनटीएकडून शेअर केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं त्यानुसार ही यादी जाहीर करण्यात आली आहे. देशभरातील एकूण 8 लाख 72 हजार 432 विद्यार्थ्यांनी जेईई मेन सत्र – 1 च्या (बीई, बीटेक) परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी

 • 7 लाख 69 हजार 589 विद्यार्थी परीक्षेत पात्र
 • परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 2 लाख 21 हजार 719 मुली
 • 5 लाख 47 हजार 867 मुले
 • यंदा 3 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी जेईई परीक्षा दिली.

यंदा जेईई मेन 407 शहरांमधील 588 परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती, ज्यात भारताबाहेरील १७ शहरांचा समावेश होता. मनामा, दोहा, दुबई, काठमांडू, मस्कत, रियाध, शारजाह, सिंगापूर, कुवेत सिटी, क्वालालंपूर, लागोस / अबुजा, कोलंबो, जकार्ता, व्हिएन्ना, मॉस्को, पोर्ट लुई आणि बँकॉक येथील परीक्षा केंद्रावर जेईई मेन परीक्षा पार पडली.

100 पर्सेटाईल मिळविणारे विद्यार्थी

 1. जस्ती यशवंत वी. वी. एस., , तेलंगणा
 2. सार्थक माहेश्वरी, हरयाणा
 3. अनिकेत चट्टोपाध्याय, तेलंगणा
 4. धीरज कुरुकुंडा, तेलंगणा
 5. कोय्याना सुहास, आंध्र प्रदेश
 6. कुशाग्र श्रीवास्तव, झारखंड
 7. मृणाल गर्ग, पंजाब
 8. स्नेहा पारीक, आसाम
 9. नव्या, राजस्थान
 10. पेनिकलापती रवि किशोर, आंध्र प्रदेश
 11. पोलिशेट्टी कार्तिकेय, आंध्र प्रदेश
 12. बोया हरेन सात्विक, कर्नाटक
 13. सुमित्रा गर्ग, उत्तर प्रदेश
 14. रूपेश बियाणी, तेलंगणा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: JEE Main 2022 Result: नागपूरचा अदय क्रिष्णा जेईई मेनमध्ये राज्यात अव्वल! देशातील एकूण 14 जणांना 100 टक्के गुणhttps://ift.tt/wCjGUFd