PCOS पासून सुटका मिळवण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या.
PCOS म्हणजे काय?
पॉलीसिस्टिक ओव्हेरीज सिंड्रोम (PCOS) हा स्त्रियांमधील जीवनशैलीशी संबंधित सर्वात सामान्य आजारांपैकी एक आहे. या आजारात हार्मोनल असंतुलन होते. त्यामुळे वजन वाढते, मासिक पाळी अनियमित होते, चेहऱ्यावर केसांची वाढ होऊ लागते. या रोगात, अंडाशयात लहान गाठी तयार होतात. यामुळे मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम होतो आणि वंध्यत्व देखील होऊ शकते. या आजारात लठ्ठपणा आणि मधुमेह वाढण्याचीही शक्यता असते.
PCOS पासून कशी सुटका मिळवाल?
PCOS आजार पूर्णपणे बरा होऊ शकत नाही परंतु योग्य काळजी घेतल्यास यावर नियंत्रण मिळवता येते. यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि औषधं घेणे अतिशय महत्वाचं आहे. हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी तंदुरुस्त राहणं सर्वात आवश्यक आहे. वजन कमी झाल्यामुळे PCOS कमी होण्यास सुरुवात होते आणि जास्त वजनामुळे PCOS वाढते. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात ठेवणं गरजेच आहे.
कोणता व्यायाम करायचा?
1. PCOS नियंत्रणात ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे चालणं. दररोज किमान 30-40 मिनिटे चालल्यानं वजन नियंत्रणात राहते.
2. दुसरा मार्ग म्हणजे एरोबिक, कार्डिओ किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम ज्यामध्ये वजन कमी होते. तुम्ही नाचणे किंवा पोहणे याचाही समावेश करु शकता. कमी वजनामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि PCOS मुळे उद्भवणारे इतर आजार होण्याची शक्यता कमी होते आणि मासिक पाळी देखील नियमित होऊ शकते.
3. तिसरा सर्वोत्तम मार्ग म्हणजे योग, कपालभाती प्राणायाम हा PCOS कमी करण्यासाठी सर्वोत्तम योग आहे. दिवसातून किमान 10 मिनिटे कपालभाती करून PCOS नियंत्रणात ठेवता येतो. याशिवाय अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम देखील हार्मोनल असंतुलन सुधारण्यासाठी मदत करतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/tbHl41P Infection : पावसाळ्यात फंगल इंफेक्शनचा धोका, अशी मिळवा सुटका
<a href="https://ift.tt/cXPd8Y4 : सावधान! 'फ्रूट शेक' आरोग्यासाठी हानिकारक, आयुर्वेद काय सांगत? वाचा सविस्तर
<a href="https://ift.tt/iwshAWp Tips : पावसाळ्यात संधिवातच्या समस्येपासून सुटका हवीय? या गोष्टींची काळजी घ्या...
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: PCOS Problem : PCOS च्या समस्येपासून सुटका मिळवा, हे उपाय नक्की करुन पाहाhttps://ift.tt/Gzgv9Hw
0 टिप्पण्या