Ratnagiri : बेरोजगारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, जिल्हा परिषदेत होणार बंपर भरती Rojgar News

Ratnagiri : बेरोजगारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, जिल्हा परिषदेत होणार बंपर भरती Rojgar News

Recruitment 2022

रत्नागिरी : नोकरीच्या (Jobs) शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रत्नागिरी (Ratnagiri) जिल्हा परिषदेत (Zilla Parishad) पुढील काही दिवसांमध्ये बंंपर भरती होणार आहे. वर्ग एक ते वर्ग चार पादांसाठी ही संधी असणार आहे. सध्या रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये तब्बल दोन हजार 844  पदे रिक्त आहेत. ही सर्व रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे बेरोजगारांना सरकारी नोकरींची संधी उपलब्ध होणार आहे. जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन आणि शिक्षण विभागातील सर्वाधिक जागा रिक्त आहेत. कामासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे बेरोजगारांना रत्नागिरी जिल्हा परिषदेंतर्गत विविध पदांवर काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. दरम्यान दुसरीकडे येत्या दीड वर्षात मोठ्याप्रमाणात तरुणांना रोजगार उलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा केंद्राच्या वतीने देखील करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रकडून करण्यात येणाऱ्या नोकरभरतीमध्ये देखील तरुण आपले नशीब अजमावू शकतात.

कोरोनामुळे वाढली बेरोजगारी

देशासह राज्यात गेले दोन वर्ष कोरोनाचे संकट होते. कोरोनाच्या काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे ठप्प झाले. कंपन्या बंद होत्या. त्यामुळे अनेकांनी आपले रोजगार गमावले. हातात नोकरी नसल्याने पैसा देखील नव्हता. त्यामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली. बाजार सुस्तावला. या काळात नोकरीच्या संधी देखील कमी झाल्या होत्या. मात्र आता कोरोनाचे सावट कमी झाले असून, सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी खासगी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अनेकांना पुन्हा रोजगार भेटल्याने अर्थचक्र गतिमान झाले आहे.

सरकारी नोकऱ्यांनाही फटका

खासगी नोकऱ्याप्रमाणेच या काळात सरकारी नोकऱ्यांची स्थिती झाली होती. कोरोनाच्या काळात अनेक स्पर्धा परीक्षांचे पेपर रद्द झाले तर काही पुढे ढकलण्यात आले. याचा मोठा फटका हा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थांना बसला होता. मात्र आता कोरोनाचे संकट कमी झाले असून, विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येत आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये देखील विविध पदांसाठी तब्बल  दोन हजार 844 जागांवर भरती होणार असून, ही विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Ratnagiri : बेरोजगारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, जिल्हा परिषदेत होणार बंपर भरतीhttps://ift.tt/LiPZ7gS

0 Response to "Ratnagiri : बेरोजगारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, जिल्हा परिषदेत होणार बंपर भरती Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel