29th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. ऑगस्ट महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. विविध सणवारांचा श्रावण महिना संपून आजपासून भाद्रपद महिन्याला सुरुवात झाली आहे. भाद्रपद महिन्यात गणपतीचे आगमन देखील होते. तसेच पितृपक्ष पंधरवडा सुद्धा याच महिन्यात येतो. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस भाद्रपद महिन्यात येतात. हे जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 29 ऑगस्टचे दिनविशेष.

सन 1947 साली भारतीय संविधान सभेने संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली.

इ.स. 1880 साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय शिक्षणतज्ञ, स्वातंत्र्यसेनानी, आधुनिक संस्कृत कवी आणि राजकारणी डॉ माधव श्रीहरी अणे यांचा जन्मदिन.

इ.स. 1887 साली ब्रिटीश कालीन भारतातील प्रख्यात चिकित्सक आणि देशसेवक तसेच, गुजरात राज्याचे पहिले मुख्यमंत्री सेवक जीवराज मेहता यांचा जन्मदिन.

सन 1949 साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय अवकाश वैज्ञानिक आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे प्रमुख आणि माजी अध्यक्ष, तसचं अवकाश आयोगाचे माजी अध्यक्ष, के. राधाकृष्णन यांचा जन्मदिन.

सन 1976 साली भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक आणि हिंदु मुस्लिम ऐक्याचे समर्थक असलेले बंगाली कवी, लेखक आणि संगीतकार काझी नझरूल इस्लाम यांचे निधन.

सन 1986 साली महाराष्ट्रीयन मराठी शिक्षणतज्ञ आणि पुणे येथील महाराष्ट्र विद्यालयाचे संस्थापक तसचं, पुणे विद्यार्थी गृहाचे संस्थापक सदस्य गजानन श्रीपत खैर यांचे निधन.

सन 2007 साली ब्रिटीश राजवटील प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र सेनानी, भारतीय राजकारणी आणि हरियाणा राज्याचे माजी चौथे मुख्यमंत्री बनारसी दास गुप्ता यांचे निधन.

सन 2008 साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेत्री जयश्री गडकर यांचे निधन.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/lQyjwX9 Days in August : ऑगस्ट महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

<a href="https://ift.tt/pohsTFV 2022 : श्रावण महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: 29th August 2022 Important Events : 29 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटनाhttps://ift.tt/Ebj7d05
0 टिप्पण्या