DRDO Recruitment: वैज्ञानिकांच्या भरतीला अर्थमंत्रालयाची तत्वत: मान्यता! मंजूर पदांची संख्या 7773, टप्प्याटप्प्याने होणार भरती Rojgar News

DRDO Recruitment: वैज्ञानिकांच्या भरतीला अर्थमंत्रालयाची तत्वत: मान्यता! मंजूर पदांची संख्या 7773, टप्प्याटप्प्याने होणार भरती Rojgar News

DRDO Recruitment

DRDO Recruitment: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) भारतातील लष्कर किंवा संरक्षण क्षेत्राशी संबंधित कामात सक्रिय आहेच, पण ती सर्वसामान्यांसाठी वेळोवेळी नवनवीन संशोधन करत राहते. या कामांसाठी डीआरडीओला कर्मचाऱ्यांची गरज असते. गेल्या काही वर्षांत येथे कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत रिक्त जागा भरण्यासाठी (DRDO Recruitment) 1248 वैज्ञानिकांच्या भरतीला आता अर्थ मंत्रालयाची तत्वत: मान्यता मिळाली आहे. ही भरती प्रक्रिया (Recruitment Process) पुढील 3-4 वर्षांत टप्प्याटप्याने पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे.

टप्प्याटप्प्याने होणार भरती

या भरती प्रस्तावांतर्गत डीआरडीओच्या विविध लॅबमध्ये शास्त्रज्ञांच्या एकूण 814 जागा रिक्त आहेत. याशिवाय शास्त्रज्ञांची ४३४ नवीन पदेही निर्माण करण्यात आली असून, ती भरण्याची गरज आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजूर पदांची संख्या 7773 आहे. सध्या डीआरडीएमध्ये 6959 शास्त्रज्ञ काम करत आहेत, जे पदांच्या संख्येपेक्षा खूपच कमी आहे.

मेक इन इंडिया थीममुळे कर्मचाऱ्यांची गरज

भारत सरकार गेल्या अनेक वर्षांपासून मेक इन इंडिया थीमवर काम करत आहे आणि त्याचा प्रचार करत आहे. ही मोहीम सुरू झाल्यानंतर विद्यमान कर्मचाऱ्यांवरील भार वाढला आहे. या पार्श्वभूमीवर डीआरडीओने लवकरात लवकर भरती भरावी, असा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, डीआरडीओमधील शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी परफॉर्मन्स रिलेटेड इन्सेन्टिव्ह स्कीम (पीआरआयएस) लागू करण्याची मागणी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. इस्रो आणि अणुऊर्जा विभागात अशा प्रकारची योजना आधीच सुरू आहे.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: DRDO Recruitment: वैज्ञानिकांच्या भरतीला अर्थमंत्रालयाची तत्वत: मान्यता! मंजूर पदांची संख्या 7773, टप्प्याटप्प्याने होणार भरतीhttps://ift.tt/OenupC1

0 Response to "DRDO Recruitment: वैज्ञानिकांच्या भरतीला अर्थमंत्रालयाची तत्वत: मान्यता! मंजूर पदांची संख्या 7773, टप्प्याटप्प्याने होणार भरती Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel