<a href="https://ift.tt/1nA7Dsx Peel Benefits : केळी (Banana) आरोग्यासाठी (Health Benefits) अतिशय लाभदायक आहे, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. केळी (Banana) शरीर सुडौल बनवण्यात मदत करतं. अनेक बॉडी बिल्डर केळ्याचं सेवन स्नायू (Musucles) बनवण्यासाठी करतात. पण तुम्ही केळं खाल्ल्यानंतर त्यांची साल फेकून देताय का? तर ही बातमी नक्की वाचा. तुम्हाला माहित नसेल की केळ्याप्रमाणेच केळ्याची सालंही शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. केळ्याची साल आपला अनेक समस्यांपसून सुटका करु शकते. तुम्ही कचरा समजून फेकणारी केळ्याची साल अनेक पोषकतत्वांनी परिपूर्ण आहे. केळ्याच्या साल व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम यांचा उत्तम स्त्रोत आहे. यामुळे अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. कशी ते जाणून घ्या.

केळ्याच्या सालीचे फायदे

1. पचनक्रिया सुधारण्यात प्रभावी

केळीच्या सालीमुळे पचनासंबंधित समस्या दूर होतात. विशेषत: जर तुम्हाला बद्धकोष्ठता आणि जुलाबाची समस्या असेल तर केळीची साल तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकते. केळ्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, यामुळे तुम्हाला पचनासंबंधित विकारांवर मात करण्यास मदत होते.

2. दात स्वच्छ करण्यासाठी करा वापर

केळ्याची साल पचनविकार दूर करण्यासोबतच इतरही कामात फायदेशीर आहे. तुम्ही दात स्वच्छ करण्यासाठी केळ्याच्या सालीचा वापर करु शकता. केळ्याच्या सालीमध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम पिवळ्या दातांची समस्या दूर करण्यास मदत करते. यासाठी रोज दातांवर केळीची सालं चोळा. यामुळे खूप फायदा होईल.

3. त्वचेवरील सुरकुत्या कमी करते

त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यासाठी केळीच्या सालीचा वापर केला जाऊ शकतो. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-एजिंग गुणधर्म आहेत, जे त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात.

4. मुरुमांपासून मिळेल सुटका

केळीच्या सालीमुळे पिंपल्सची समस्या कमी होते. यासाठी केळीची साल पिंपल्स आलेल्या भागावर चोळा. हा उपाय आठवडाभर केल्यानंतर तुम्हाला त्वचेवर फरक दिसेल. तुम्हाला पिंपल्सपासून सुटका मिळेल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या

<a href="https://ift.tt/YDAyCw4 of Black Pepper : आहारात काळी मिरीचा समावेश करा, आरोग्यासह त्वचेसाठीही आहे फायदेशीर

<a href="https://ift.tt/xEUIjAl Tips : तुमच्या डाएटमध्ये 'या' 10 सुपरफूडचा समावेश करा, वजन कमी करण्यात होईल मदत

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : केळ्याची सालं फेकण्याआधी जाणून घ्या फायदे, अनेक समस्यांपासून मिळेल सुटकाhttps://ift.tt/Ebj7d05
0 टिप्पण्या