Job opportunity : कोरोनंतर रोजगाराच्या संधी; भविष्यात एज्युटेक स्टार्टअपच्या माध्यमातून मिळणार हजारो हातांना काम Rojgar News

Job opportunity : कोरोनंतर रोजगाराच्या संधी; भविष्यात एज्युटेक स्टार्टअपच्या माध्यमातून मिळणार हजारो हातांना काम Rojgar News

कोरोनापूर्वीच (Corona) भारतात (India) शिक्षण क्षेत्रात टेक कंपन्यांचा प्रवेश झाला. परंतु कोरोनानंतर शाळा (school), महाविद्यालय बंद झाल्याने एज्युटेक कंपन्यांचा विस्तार जोमानं सुरू झाला. मोठ्या प्रमाणात एज्युटेकचे स्टार्टअप सुरू झाले. या घडीला देशात सात मोठे स्टार्टअप काम करत आहेत. यामध्ये BYju’s, Eruditus, Unacadamy, lead, upGrade, vedantu आणि physics wala यांचा समावेश आहे.ऑनलाइन क्लासेस आणि अभ्यासात तंत्रज्ञान मागे राहणार नाही, हे सर्व्हे आणि अनुमानातूनही सिद्ध होतंय. येणाऱ्या एका दशकात भारतात एज्युटेक क्षेत्राचे व्हॅल्यूएशन वाढून 30 अब्ज डॉलर होण्याची शक्यता आहे. सध्या एज्युटेक क्षेत्राचं मार्केट जवळपास 2.8 अब्ज डॉलर एवढं आहे. 2025 पर्यंत या क्षेत्राचा विस्तार चार पटीनं वाढून 10.4 अरब डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. लहान मोठे धरून देशात 9 हजाराहून अधिक एज्युटेक स्टार्टअप आहेत. एका अहवालानुसार 2018-19 नंतर केवळ 3 वर्षात इंडियन एज्युटेक स्टार्टअपचा महसूल दुप्पट झालाय. एज्युटेक स्टार्टअपचे नर्सरी ते बारावी पर्यंत, परीक्षांची तयारी, ऑनलाईन सर्टिफिकेशन, स्कील डेव्हलपमेंटसहीत अनेक कोर्सस उपलब्ध आहेत.

कमीत कमी खर्चात शिक्षण

वेदांतूवर JEE आणि NEET साठी कोर्स फी 16 हजार 500 रुपये आहे. 12 वी CBSC, PCM म्हणजे physic, chemestry आणि maths साठी तीन महिन्यांची ट्युशन फी 9 हजार रुपयांपासून सुरू होते. याप्रकारे BYju’s वर JEE आणि NEET च्या तयारीसाठी 1 वर्षाची कोर्स फी 85,000 रुपये आहे. तिथेच CBSC ची 12 वीची PCM ट्युशन फी वेदांतुप्रमाणे आहे. परंतु या कोर्सचं स्ट्रक्चर आणि दर्जा वेगवेगळा असू शकतो. एज्युटेकमध्ये शिक्षण घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एज्युटेक प्लॅटफॉर्मवरील कोर्स इतर संस्थांच्या कोर्सपेक्षा स्वस्त असतात. Upsc , CA इंजिनियरिंग, मेडिकल या कोर्सच्या तयारीसाठी एज्युटेकचे काही कोर्सेस हे सामान्य कोचिंग इंस्टिट्युटच्या कोर्ससच्या तुलनेत सुद्धा स्वस्त आहेत.याप्रकारे ऑनलाईन सर्टिफिकेशन देणारे एज्युटेक प्लॅटफॉर्म प्रमुख विद्यापीठ आणि कॉलेजसोबत संलग्नित सर्टिफिकेट देतात त्यामुळे एज्युटेकबद्दल विश्वास आणि मूल्य वाढलंय. भविष्यात या क्षेत्रात मोठ्याप्रमाणात रोजगाराच्य संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

रोजगाराच्या संधी

एज्युटेक कंपन्या, शाळा आणि शिक्षकांसाठी देखील सहाय्यक ठरत आहेत. असेसमेंट, क्लासेस, होमवर्क सोल्युशन, रियल टाइम ट्रॅकिंग, इन्स्टंट रिपोर्ट या सारख्या शैक्षणिक सुविधा एज्युटेक कंपन्या पुरवतात. एवढंच नाही तर या कंपन्यांनी प्रशासकीय काम देखील सोपे केलंय.एज्युटेक प्लॅटफॉर्मच्या मदतीने पालक शाळेची फीस ऑनलाईन पद्धतीने जमा करतात, शिक्षकांसोबत बोलतात तसेच पाल्याच्या प्रगतीविषयी माहितीही घेतात. त्यामुळे भविष्यात या क्षेत्राचा विस्तार वाढून मोठ्याप्रमाणात मनुष्यबळाची गरज भासू शकते. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या संधी दिसून येत आहेत.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Job opportunity : कोरोनंतर रोजगाराच्या संधी; भविष्यात एज्युटेक स्टार्टअपच्या माध्यमातून मिळणार हजारो हातांना कामhttps://ift.tt/HWflphM

0 Response to "Job opportunity : कोरोनंतर रोजगाराच्या संधी; भविष्यात एज्युटेक स्टार्टअपच्या माध्यमातून मिळणार हजारो हातांना काम Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel